चिमूर व्यापारी संघटना च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रवीण सातपुते 62 मतानी विजय चिमूर मध्ये पहिल्यांदा मतदानद्वारे निवडणूक

0
193

चिमूर व्यापारी संघटना च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत
प्रवीण सातपुते 62 मतानी विजय

चिमूर मध्ये पहिल्यांदा मतदानद्वारे निवडणूक

विकास खोब्रागडे

चंद्रपूर जिल्यातील चिमूर व्यापारी संघटना ची निवडणूक दि १३ डिसेंबर ला मतदान प्रकियेने पार पडली असताना अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रवीण सातपुते यांनी १८५ मते घेऊन बाजी मारीत विजयी झाले.चिमूर व्यापारी संघटना ची एकूण मते ४४८ असताना या निवडणुकीत ३४७ मतदान झाले . अध्यक्ष पदाची निवडणुकीत छईलुसिंग राठोड यांना १३ मते, प्रवीण सातपुते यांना १८५ मते, श्याम बंग यांना १२३ मते व विनोद शर्मा यांना २४मते मिळालेली असून प्रवीण सातपुते यांनी १८५ मते घेत ६२ मतांनी अध्यक्ष पदासाठी विजयी झाले . यामध्ये २मते अवैध ठरली.चिमूर व्यापारी संघटना चे मावळते अध्यक्ष प्रमोद बारापात्रे यांच्या नेतृत्वात निवडणूक कार्यक्रम पार पडली असून या निवडणुकित निवडणूक निर्णय अधिकारी बाळकृष्ण झिंगरे, निवडणूक अधिकारी योगेश ढोने प्रशांत जोशी, उमेश गारुडे व इतर सहकाऱ्यांनी काम पाहिले.चिमूर व्यापारी संघटना ची निवडणूक शांततेत पार पडली.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here