घुग्घुसच्या आठवडी बाजारातून मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीवर कारवाई करा

95

घुग्घुसच्या आठवडी बाजारातून मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीवर कारवाई करा

प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे यांची मागणी

घुग्घुस शहरातील आठवडी बाजारातून मोठया प्रमाणात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीवर कारवाई करा अशी मागणी प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे यांनी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

घुग्घुस नगर परिषद कार्यालय ते नकोडा मार्गावरील रस्त्यापर्यंत अनेक वर्षापासून दर रविवारी मोठा आठवडी बाजार भरतो. घुग्घुस हे औद्योगिक शहर असून लोकसंख्या ५० हजारांच्या जवळपास आहे. घुग्घुस परिसरात एसीसी सिमेंट कंपनी, लॉयड्स मेटल्स कंपनी, वेकोलिच्या कोळसा खाणी आहे. ग्रामीण भागातून व शहरी भागातून भाजीपाला विक्रेते आठवडी बाजारात येतात त्यामुळे अनेक गावातील व घुग्घुस शहरातील महिला, पुरुष भाजपाला खरेदी करण्यासाठी आठवडी बाजारात येतात.

आठवडी बाजारात मोठी गर्दी होत असल्याने ही संधी हेरून मोबाईल चोरी करणाऱ्यांची टोळी आठवडी बाजारात मोबाईल चारी करण्यासाठी येते. सध्या आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. आतापर्यंत अनेक नागरिकांचे मोबाईल चोरी गेले आहे. मोबाईल चोरीच्या घटनेवर आळा घालण्यासाठी मोबाईल चोर टोळीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी भाजपाच्या नितु चौधरी, पुजा दुर्गम, वैशाली ढवस, अमीना बेगम, पुष्पा रामटेके, सुनीता पाटील, सिमा पारखी, सारिका भोंगळे, निशा उरकुडे व महिला उपस्थित होत्या.

advt