चंद्रपूर नगरीतील जटपुरा गेट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी जागेचा ठराव सर्वानुमते पारीत

0
726

चंद्रपूर नगरीतील जटपुरा गेट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी जागेचा ठराव सर्वानुमते पारीत
🟥🔲 चंद्रपूर 🟫🔲किरण घाटे🟫🔲
आज बुधवार दिनांक ३१ मार्च २०२१ ला चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वेळवर येणाऱ्या विषयावर जटपुरा गेट परिसरात मनपा कांजी कॉम्प्लेक्स समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारणी साठीचा जागेचा विषय घेण्यात आला, या विषयावर नगरसेवक देवेंद्र बेले यांनी सभागृहात सांगितले की शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंद्रपूर नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा जटपुरा गेट परिसरात उभारावा ही ऐतिहासिक आठवण सदैव स्मरणात राहावी ही चंद्रपूर नागरिकांची जनभावना आहे, म्हणून शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारणी साठीचा जागेचा ठराव सर्वानुमते पास करावा तसेच या विषयावर नगरसेवक पप्पू देशमुख यांनी सुद्धा जटपुरा गेट परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारावा असे मत सभागृहात मांडले तसेच छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळ यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी साठी जागेकरिता पत्र दिले होते यावर विद्यमान महापौर राखीताई कंचरलावर, व स्थायी समिती सभापती रवी आस्वानी यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी साठी जागेचा ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली तेव्हा सर्व नगरसेवकांनी सर्वानुमते या ठराव ला मंजुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here