लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगात 52 वर्ष राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

175

लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगात 52 वर्ष राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा


दि. ४ मार्च २०२३ शनिवार सकाळ रोज सुरक्षा अधिकारी विपीन राइकवार यांनी सर्व वरिष्ठ, स्थायी, अस्थायी कर्मचार्यांना एकजूट बोलवुन सर्वांना सुरक्षा ची शपथ देण्यात आले.तसेच जय सुरक्षा चे नारे देण्यात आले.
तसेच कंपनीचे उपाध्यक्ष श्री.पवन मेश्राम यांनी कामगारांना मार्गदर्शन केले आणि सांगितले कि राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2023: दरवर्षी 4 मार्च रोजी देशात राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट अपघातांना रोखणे आणि त्यासंबंधित सुरक्षा उपाय आणि प्रोटोकॉलबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणे हे आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिन आठवडाभर साजरा केला जातो. या वर्षी त्याची थीम ‘आमचे मिशन – शून्य हानी’ आहे. जाणून घेऊया राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे सर्वसामान्यांच्या जीवनात काय महत्त्व आहे आणि त्याचा इतिहास काय आहे?

जाणून घ्या राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा इतिहास काय आहे

सन 1965 मध्ये औद्योगिक सुरक्षेची पहिली परिषद आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 11 ते 13 डिसेंबर दरम्यान नियोक्ता संघटना, राज्य सरकार, कामगार संघटना आणि इतर संस्थांच्या मदतीने ही परिषद आयोजित केली होती. 1966 मध्ये, कामगार मंत्रालयाने 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा परिषद (NSC) स्थापन केली. पुन्हा सोसायटी नोंदणी कायदा 1860 आणि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 अंतर्गत सोसायटी म्हणून नोंदणी करण्यात आली. 1972 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो.
आपण सर्व कामगार एकजूट होणुन दर महिण्याचा १ तारीखला सुरक्षा सल्ला देवु. एकमेका बर बोलुन शुण्य दुर्घटना करु. उत्पादक प्रमुख श्री.गुणाकार शर्मा यांनी कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. यावेळी लाॅइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड सर्व कर्मचारी उपस्थित होते.

advt