कोरोना जनजागृती काव्यधारा – १

0
324

महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर रचना आम्ही आपणास देत आहोत.

 

कोरोना जनजागृती काव्यधारा – १

पण मनाने जवळ राहू…

किती हासायाचो आपण अता डोळा आले पाणी
लादली ही कोरोनाने जगावरती आणीबाणी …

घराचा पिंजरा केला एवढ्याश्या विषाणूने
पळायाची जी लोकलने थांबली ती चाकरमानी…

संकटावर मात करण्या चला एकजुट होऊ या
साथ देऊ शासनाला गाऊ आनंदाची गाणी…

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ चे पथक येता
तपासणी सर्वांनी करणे एवढे ठेवा हो ध्यानी…

जरा घोंगावते वादळ मात्र हे शांत ही होईल
चारा चोचीमध्ये घेऊन पाखरे उडतिल बघ रानी…

ठेऊ या शारिरीक अंतर,मनाने पण जवळ राहू
कुणा दुखवायचे नाही अशी बोलू प्रेमळ वाणी…

एवढ्याश्या विषाणुने शिकवले मानवजातीला
खेल है चंद सांसोका जिंदगी है आनीजानी…

जवळ आले म्हणता म्हणता पुन्हा दूर झाले जग
उद्या इतिहासाच्या पानी असणार ही कहाणी …

झुंजतांना कोरोनाशी शहिद झाले जे योद्धे
करू वंदन त्या वीरांना आपुल्या शब्दसुमनांनी…

 

कवी – नरेशकुमार बोरीकर, चंद्रपूर
संपर्क -9604944590

••••

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here