वंचित बहुजन आघाडी चिमूर नगरपरिषद निवडणूक लढविणार !

0
457

वंचित बहुजन आघाडी चिमूर नगरपरिषद निवडणूक लढविणार !

अनेक नागरिकांनी केला वंचित आघाडीत प्रवेश

चिमुरात सहविचार सभेचे आयोजन

चिमूर येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे सहविचार सभेचे आयोजन नुकतेच चिमूर येथे करण्यात आले.
सदर सहविचार सभेकरिता महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन आघाडीचे महासचिव कुशल मेश्राम उपस्थित होते. ही सहविचार सभा डॉ. रमेशकुमार गजभे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सहविचार सभेला प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद सांदेकर (निरीक्षक चंद्रपूर-गडचिरोली), कुलदीप श्रीरामे ( जिल्हा महासचिव चंद्रपूर), कपूरभाऊ दुपारे (जिल्हा सदस्य चंद्रपूर) ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या सहविचार सभेप्रसंगी सारंगजी दाभेकर (माजी तालुका प्रमुख शिवसेना शाखा चिमूर), रमेशजी दडमल, मधुकर गेडाम यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. त्यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. चिमूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळत असून, वंचित बहुजन आघाडीत कार्यकर्ते प्रवेश करीत असून पक्षाला बळकटी मिळत आहे.
यावेळी उपस्थित तालुका व शहर पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना कुशलभाऊ मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत आपल्या संघटनात्मक धोरणावर चर्चा करून ही चिमूर ची नगरपरिषद निवडणूक आपण नक्कीच जिंकू शकतो. असा विश्वास उपस्थितांसमोर व्यक्त केला.
नगर परिषद निवडणुकीत ज्यांना कुणीही ओळखत नाही अश्या लोकांना आपण तिकीट देऊ आणि आपण सर्व मेहनत घेऊन तळागाळातील वंचित समूहा पर्यंत वंचित बहुजन आघाडीची भूमिका, ध्येयधोरणे वंचित नागरिकापर्यँत पोहचवू अशी सूचना सर्व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळींना केली. या सभेला आवर्जून उपस्थित असलेले अरविंद सांदेकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले की, वंचीत बहुजन आघाडीत नागरिकांचा पक्ष प्रवेश पाहता, पक्षाला चिमूर तालुक्यात बळकटी मिळत आहे. यावेळी नगरपरिषद निवडणुकी बाबद्द रणनीती आखण्यात आली. सहविचारी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन डॉ. रमेशकुमार गजभे यांनी केले. या सहविचार सभेचे आयोजन चिमुरचे तालुका अध्यक्ष स्नेहदिप खोब्रागडे, तसेच चिमूर तालुका पदाधिकारी, चिमूर शहर पदाधिकारी व सन्माननीय कार्यकर्ते मंडळी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शैलेश गायकवाड यानी केले. प्रास्ताविक शालीकजी थुल यांनी तर आभार नागदेवते यांनी मानले. यावेळी चिमूर तालुक्यातील प्रत्येक गावागावातील वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here