सबा खान मुस्लीम समाजातून बनली प्रथम सी. ए.

0
557

सबा खान मुस्लीम समाजातून बनली प्रथम सी. ए.

राजुरा/प्रतिनिधी:- इन्स्टिट्यूट ऑफ चार्ट्ड अकाऊंट ऑफ इंडिया मार्फत घेण्यात आलेल्या अंतीम परीक्षेत राजुरा शहरातील सबा खान शब्बीर पठाण ही सी. ए. परीक्षेत मुस्लीम समाजातून प्रथम पास होणारी ठरली आहे.

लहापणापासूनच शिक्षणाचे आवड असणारी सबा खान इन्फंट जिजस स्कूल राजुरा येथे 10 वी वर्गात 95 टक्के घेउन पास झाली. त्यानंतर 12 गुरुनानक कॉलेज बल्लारपूर येथे 86 टक्के घेऊन पास झाली. त्यानंतर सी ए. साठी नागपूर येथे शिकायला गेली. नुकत्याच लागलेल्या सी. ए. परीक्षेत नागपूर विभागातून प्रथम पाच मध्ये तिने स्थान मिळविले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातुन प्रथम येण्याचा मान मिळविलेले आहे.

त्यांनी आपल्या यशाचे श्रेय गुरुजन वर्ग आणि आई वडिलांना दिले आहे. तसेच प्रथम मुस्लिम समाजातून सी. ए. पास झाल्याने मुस्लिम समाजाकडून अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here