चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4852

0
451

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4852

24 तासात नवीन 190 बाधित; तीन बाधितांचा मृत्यू

आतापर्यंत बरे झालेल्या बाधितांची संख्या 2557

उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2239

चंद्रपूर, दि. 10 सप्टेंबर: जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 190 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 852 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2 हजार 239 असून आतापर्यंत 2 हजार 557 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 24 तासांमध्ये तीन बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये, अंचलेश्वर वॉर्ड चंद्रपुर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यू तुकुम चंद्रपूर येथील 58 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 6 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 9 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

तर, तिसरा मृत्यु नगीना बाग चंद्रपुर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 56 बाधितांचा मृत्यू झालेला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 52, तेलंगाणा एक, बुलडाणा एक व गडचिरोली दोन बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 120, सावली तालुक्यातील 2, बल्लारपूर तालुक्यातील 11,  ब्रह्मपुरी तालुक्यातील 5, मूल तालुक्यातील 17, राजुरा तालुक्यातील 7, वरोरा तालुक्यातील 2, कोरपना तालुक्यातील 1, भद्रावती तालुक्यातील 5, पोंभूर्णा तालुक्यातील 10, नागभीड तालुक्यातील 2,सिंदेवाही तालुक्यातील 5, चिमूर तालुक्यातील 2, वणी- यवतमाळ येथून आलेला 1 असे एकूण 190 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले चंद्रपूर शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ वार्ड, सुमित्रा नगर तुकुम, महाकाली काॅलरी परिसर, गुरुद्वारा परिसर, अष्टभुजा वार्ड, दवा बाजार नगीना बाग परिसर, सराई वार्ड, दाताळा, सिस्टर कॉलनी परिसर, घुटकाळा वार्ड, हरी ओम नगर, बाबुपेठ वार्ड, रामनगर भागातून बाधित पुढे आले आहे.

तालुक्यातील या ठिकाणी आढळले बाधित:

मूल तालुक्यातील चितेगाव भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द, पारडी भागातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील सास्ती कॉलनी परिसर, बामनवाडा परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील कळमना, कोठारी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील नवीन सुमठाणा, शिवाजी वार्ड, जुना सुमठाणा, परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील नेहरू वार्ड, खडसंगी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here