प्रा. दिनेश घागरगुंडे यांची भारतीय बौध्द महासभा राजुरा तालुका उपाध्यक्ष (संस्कार विभाग) पदी तर इंजि. राहुल भगत यांच भारतीय बौध्द महासभा ग्राम शाखा गोवरीच्या अध्यक्ष पदी एकमताने निवड

180

प्रा. दिनेश घागरगुंडे यांची भारतीय बौध्द महासभा राजुरा तालुका उपाध्यक्ष (संस्कार विभाग) पदी तर इंजि. राहुल भगत यांच भारतीय बौध्द महासभा ग्राम शाखा गोवरीच्या अध्यक्ष पदी एकमताने निवड

राजुरा, 4 जानेवारी : काल सायंकाळी 7 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून तक्षशिला बुद्ध विहार गोवरी च्या भव्य दिव्य परिसरात भारतीय बौध्द महासभा ग्राम शाखा गोवरी गठीत करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष पदी इंजि. राहुल कवडूजी भगत, उपाध्यक्षा पदी अनिता सुरेश कास्वटे, सचिव पदी मेघा प्रमोद पडवेकर व सौरभ गौतम करमनकर, कोषाध्यक्ष म्हणून बुदर्श कृष्णाजी कास्वटे, सरचिटणीस लोभेश विश्वनाथ करमनकर, हिशोबनीस आचल दिनेश घागरगुंडे, कार्यालयीन सचिव संदीप प्रकाश कास्वटे, संघटक गौतम किसन कोल्हे / कल्पना सुभाष घागरगुंडे/ मंगला मोहन भेले / अर्चना दिनेश कास्वटे / किरण दुर्योधन वाघमारे / अरुणा भास्कर पडवेकर/प्रीती सिद्धार्थ कास्वटे आदींची निवड करण्यात आली.

वरील सर्व पदाधिकारी यांचे तसेच संबुद्ध पंचशील युवा मंडळ गोवरीचे अध्यक्ष प्रा. दिनेश घागरगुंडे यांची भारतीय बौध्द महासभा राजुरा तालुका उपाध्यक्ष (संस्कार विभाग) पदी निवड करण्यात आली. ०३/०१/२०२३ ला भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष धर्मू नगराळे, सरचिटणीस गौतम चौरे, कोषाध्यक्ष गौतम देवगडे, मुरलीधर ताकसांडे, अशोक दुबे, रवींद्र खैरे, अमोल राऊत वंचित शहर अध्यक्ष राजुरा यांच्या कडून सत्कार करण्यात आला. तेव्हा मोठ्या प्रमाणात ग्रामवासी उपस्थित होते. सर्व नाविन पदाधिकारी ची नियुक्ती झाल्याबद्दल पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.

advt