संबुद्ध पंचशील युवा मंडळ गोवरी व रमाई महिला मंडळ गोवरी कडून तक्षशिला बुध्द विहार गोवरी येथे एकलनृत्य स्पर्धेचे आयोजन व बक्षीस वितरण

198

संबुद्ध पंचशील युवा मंडळ गोवरी व रमाई महिला मंडळ गोवरी कडून तक्षशिला बुध्द विहार गोवरी येथे
एकलनृत्य स्पर्धेचे आयोजन व बक्षीस वितरण

राजुरा : दिनांक ३ जानेवारी२०२३ रोज मंगळवार ला सायंकाळी ७.०० वाजता तालुकास्तरीय एकल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कोणतेही काम करताना त्या कामात विधार्थ्यांनी स्वतःला झोकून दिले पाहिजे. अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने परिश्रम करणे आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे मुख्य परीक्षक तथा ज़ि. प. शाळा पूनागुडा चे मुख्याध्यापक जाहिर खान यांनी केले.

संबुद्ध पंचशील युवा मंडळ व रमाई महिला मंडळ गोवरीच्या संयुक्त विद्यमाने भीमा कोरेगाव शौर्य दिन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्याने भव्य तालुका स्तरीय एकलनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन ज़ि.प. चंद्रपूर माजी सभापती सुनिल उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशाताई बबन उरकुडे सरपंच गोवरी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून धर्मुजी नगराळे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा राजुरा तालुका, रविंद्र खैरे,अशोक दुबे, प्रा. अनिल पोडे, उपसरपंच ग्रा. प. गोवरी उमेश मिलमिले, प्रकाश काळे, सरपंच ग्रा. प. धिडसी रिता हनुमंते, उपसरपंच ग्रा.प. राहुल सपाट, ग्रा. सदस्य धिडसी संतोष काकडे, सरपंच वरोडा वनमालाताई कातकर, अतुल नळे, महादेव वाघमारे, पो.पा. बंडू चिडे,उत्कर्ष गायकवाड, माजी सरपंच गोवरी पौर्णिमाताई उरकुडे, तंमुस अध्यक्ष गोपीनाथ जमदाडे, ग्रा. प. सदस्य सिद्धार्थ कास्वटे, शंकर बोढे, ग्रा. प. सदस्या मनीषाताई वांढरे, भा. बौध्द. म. सरचिटणीस राजुरा गौतम चौरे, भा. बौध्द म. कोषाध्यक्ष गौतम देवगडे, प्रभाकर उरकुडे, रामपूर बौध्द समाजाचे अध्यक्ष मुरलीधर ताकसांडे समाजसेवक अमोल राऊत, तसेच नुकत्याच एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण निरंजना मंगेश भोयर, मंगेश भोयर यांचा सत्कार यावेळी सूनील उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यानंतर भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा चे अध्यक्ष धर्मू नगराळे, गौतम चौरे सरचिटणीस, गौतम देवगडे कोषाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते भारतीय बौध्द महासभा तालुका उपाध्यक्षपदासाठी (संस्कार विभाग) प्रा. दिनेश घागरगुंडे सर यांचा सत्कार करण्यात आला. आणि भारतीय बौध्द महासभा ग्राम शाखा गोवरी चे इंजी. राहुल कवडूजी भगत व पदाधिकारी यांच्या सत्कार करण्यात आला.

नृत्य स्पर्धेत ‘अ’ गटातून प्रथम संबोधी सिद्धार्थ कास्वटे, द्वितीय समृद्धी सुनिल नगराळे, तृतीय देविका राहुल लेडांगे, ‘ब’ गटातून प्रथम क्षमा दिनेश घागरगुंडे, द्वितीय नंदिनी मारोती उरकुडे, तृतीय मानवी भास्कर करमनकर, ‘क’ गटातून प्रथम सौरभ लक्ष्मण शेंडे, द्वितीय प्रीतम गोपाल बिडवे, तृतीय तेजस्विनी सुरेश भगत यांनी प्राप्त केला.

परीक्षक मुख्याध्यापक ज़ि. प. शाळा पुन्हागुळा जहीर खान, मुख्याध्यापक ज़ि. प. हायस्कूल कणाळगाव शुक्ला सर, विषय शिक्षक धानोरा इरफान शेख सर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. दिनेश घागरगुंडे, सूत्रसंचालन इंजि. राहुल भगत तर आभार प्रदर्शन बुदर्श कास्वटे यांनी मानले. या कार्यक्रमाला बहुसंख्येने गावातील जनता उपस्थित होती.

advt