शेतकऱ्यांनो सावधान, वाघ येतोय बांधावर

0
570

शेतकऱ्यांनो सावधान, वाघ येतोय बांधावर

शेतात जाऊन काम करणे झाले अवघड

 

कोरपना/प्रवीण मेश्राम
आवारपूर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कंपनीत कर्मचारी अगदी सुरक्षित आहेत. मात्र शेतकरी वर्ग भितीत जगत आहेत. वनविभाग यात अपेक्षितच अपयशी आहे. असा आरोप महिला आघाडीच्या अध्यक्षा शिला धोटे यांनी केला आहे.

कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील बहुतांश गावातील सध्या कापूस वेचणी व गहू, हरभरा पेरणीचे कामे शेतशिवारात सुरू आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त महिलावर्ग आपल्या शेतात जात आहेत. पण आता शेतकऱ्यांच्या बांधावर वाघ येऊन असल्याचे विरूर पैनगंगा वेकोली परिसरात आल्याची खमंग चर्चेत असतांना पुन्हा आवारपूरच्या अल्ट्राटेक सिमेंट वसाहतीत आल्याने शेतकऱ्यांनी शेतातील काम करतांना सावध रहाण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान येथील वनविभागाने आणी ग्रामपंचायतीने गावपातळीवर निदान एखादी दिंडी लावण्यात येण्याची गरजेनुसार गरज आहे. आता या वाघाच्या दहशतीमुळे शेतात जायचे कसे, हा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचबरोबर शेतकरी कुटूंबाचा उदहनिँवाह म्हणून बकऱ्या व गाय, म्हशी आणि बैल पाळत असतात. त्यांना चराईसाठी शेतशिवारात जावे लागते. आपला जीव मुठीत घेऊन पाळीव प्राण्यांना चराईसाठी शेतकऱ्यांना शेतशिवारात न्यावे लागत आहे. आज घडीला कोरपना तालुक्यातील विरूर गाडेगाव आणी आवारपूरच्या परिसरात वाघाची भीती निमार्ण झाली. त्यामुळे एकदा ग्रामस्थ कधी घरी परत येतो? यांच्याकडे कुटुंबीय डोळे लाऊन वाट बघत असल्याचे चित्र आता गावागावांत निर्माण झाले आहे. करीता वनविभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पण तसे होतांना दिसत नाही. तरी शेतकऱ्यांनीही
आपल्या शेतात जातांना सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here