गोदावरी अर्बन बँक परिवारातर्फे रक्तदान शिबीर

0
469

गोदावरी अर्बन बँक परिवारातर्फे रक्तदान शिबीर

 

कोरपना प्रतिनिधी
गडचांदूर:- रक्तदान जीवन दान हे मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून तसेच रक्तदान संदर्भात शासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत 8 आक्टोंबर रोजी गडचांदूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळील रज़ा कॉम्प्लेक्स मध्ये ‘गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-आॕप.सोसायटी लिमिटेड नांदेड शाखा गडचांदूरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात जवळपास 50 पेक्षा जास्त महिला,पुरूष रक्त दात्यांनी मोठ्या उत्साहात रक्तदान केले.बँकेच्या वतीने सर्व रक्तदात्यांचा पुष्पगुच्छ,प्रमाणपत्र व आकर्षक भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.नागपूर येथील डॉक्टर हेडगेवार रक्त केंद्रातील कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले. यावेळी बँकेचे महिला,पुरूष कर्मचारी,एजंट व रक्तदाते नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here