युवा संकल्प संस्थेने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा व आशा वर्कर यांचा सत्कार

0
528

युवा संकल्प संस्थेने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा व आशा वर्कर यांचा सत्कार

चामोर्शी:- गडचिरोली✍️सुखसागर झाडे

आदिवासी दिनाचे औचित्य साधत दिनांक :-09/08/2021 ला युवा संकल्प बहुउद्देशीय संस्था भेंडाळा च्या वतीने या वर्षात १०वी व १२वी मध्ये प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे त्याच प्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये अतिशय मोलाचं योगदान देणारे आशा वर्कर व डॉक्टर नर्स त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये काही विद्यार्थी व आशा वर्कर यांनी स्वतःचे मनोगत व्यक्त केले.अथक परिश्रम घेतले की, कोणतेही ध्येय सहज साध्य करता येतं असे त्यांनी सांगितले. या सर्वांचा युवा संकल्प संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व पुषपगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित डॉ. देवरावजी होळी साहेब आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र,विठ्ठलची सातपुते उप – सरपंच ग्रा. भेंडाळा, संस्थापक/अध्यक्ष राहुलजी वैरागडे युवा संकल्प संस्था महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष चेतनजी कोकावार युवा संकल्प संस्था महाराष्ट्र राज्य, दीलीपजी चलाख भाजपा.तालुका अध्यक्ष, प्रतीक राठी युवा मोर्चा अध्यक्ष, जैरामजी चलाख, निखीलजी उंडिरावाडे सदस्य ग्राम.भेंडाळा, डॉ.साबणे साहेब वैद्यकीय अधिकारी भेंडाळा, नगराडे मॅडम, नरेंद्र जुवारे, लखनजी झरकर, दिलीपजी जवादे, मोरेश्वर साखरे, .कृष्णा निकुरे, आदर्श वडेट्टीवार, कपिल नंदगिरवार, अजय बुरे, अमोल सोंनटक्के, अजय चापले, कार्तिक जुवारे,नितीन सातपुते, समस्त युवा संकल्प सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here