यवतमाळ जिल्ह्याचे वणी तालुक्यातिल कोतवाल संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन….

0
474

यवतमाळ जिल्ह्याचे वणी तालुक्यातिल कोतवाल संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन….

मनोज नवले वणी:-

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने मुंबई मंत्रालय येथे दिलेल्या निवेदनास तालुका कोतवाल संघटना…… चा पूर्ण पाठिंबा असून कोतवालांच्या सदरील मागण्या दिनांक 15 ऑगस्ट 2021 पर्यंत मंजूर न झाल्यास राज्यभरात कोतवाल संघटनेतर्फे करण्यात येणारे आंदोलनात मारेगाव तालुका कोतवाल संघटनाचा पूर्ण संख्येने सहभाग असेल असे संघटनेने निवेदनातून म्हटले आहे.

24 तास शासनाची व जनतेची सेवा करणाऱ्या कोतवालास आंदोलनाची वेळ येऊ न देता. आमच्या मागण्याचा सहृदयतेने, सहानुभूती पूर्वक विचार करून मागण्या मान्य कराव्यात जेणे करून आम्हास आमच्या मूलभूत गरजा पूर्ण करून किमान समाधान कारक जीवन जगता यावे अशी विनंती केली आहे.

कोतवाल संघटनेने मागणी केली आहे, चतुर्थ श्रेणीची शासन स्तरावर पूर्ण होई पर्यंत वेतनातील अन्यायकारक भेदभाव दूर करून समान काम समान वेतन या धर्तीवर राज्यातील सर्व कोतवाल यांना सरसकट 15,000 रू वेतन देणेबाबत,

शासन निर्णयप्रमाणे पात्र असूनही कोतवाल यांना वेतन वाढ मिळत नाही .करिता सदरील नागपूर मार्गदर्शन रद्द करणे,

कोतवाल यांना तलाठी, महसूल सहाय्यक व तत्सम पदासाठी 50 %आरक्षण मंजूर करणे,

शिपाई संवर्गाच्या सर्व रिक्त जागा कोतवाल संवर्गाातून भरणेबाबत.

कोरोना ने मृतांच्या वारसास अनुकंपा तत्वावर सेवेत समावेश करावा, सेवानिवृत्तीनंतर कोतवालास कुठलाही शासकीय लाभ मिळत नसल्या कारणाने सेवानिवृत्त कोतवालास 10 लाख रु. रक्कम निर्वाह भत्ता मिळण्यात यावा तसेच कोतवाल यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू झाली पाहिजे अशा मागण्या करण्यात आल्या आहे.

मागणी मान्य न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल व काही अनुचित प्रकार झाल्यास संपूर्ण सरकार जवाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here