खैरगाव (कवठाला) येथील राशन धारकाची मनमानी

0
605

खैरगाव (कवठाला) येथील राशन धारकाची मनमानी

 

कोरपना प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रात गरिबांना स्वस्त धान्य दुकानातून योग्य ते धान्य मिळावे म्हणून शासनाचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहेत. कोरोना काळात सुद्धा मोफत धान्य मिळत होते. हे धान्य गरीब व होतकरू कुटुंबांना मिळावे म्हणून सर्व खेड्यापाड्यात योजना चालू आहे.

अशातच स्वस्त धान्य दुकानधारक यांचे कडे तीन गावचे वाटप असते. ते धान्य शिधापत्रिका धारकांना न देता बाकी इतर गावात पैसे घेऊन धान्य वाटप करत असतो. तसेच दोन महिन्यांचे मोफत धान्य सुद्धा अजूनपर्यंत वाटप केलेले नाही.

काल देि.17/02/2022 ला त्यांच्या घरा जवळ बाहेर गावचे काही लोक धान्य नेताना आढळले. असता त्यांना गावातील काही नागरिकांनी विचारपूस केली. यावेळी त्या धान्य नेणाऱ्या नागरिकांनी आम्ही पैसे देऊन धान्य नेतो असे सांगितले. यामुळे गावतील युवक काँग्रेसचे सदस्य नागोबा आलम तसेच तडोधी उपसरपंच राजु चतुर्कर यांनी या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी झालीच पाहिजे, नाहीतर गावातील नागरिक या विषयी रितसर तक्रार तहसीलदार कोरपना यांच्या कडे करून कार्यवाही न झाल्यास उपोषण करू, असा इशारा नागोबा आलम, तडोधी उपसरपंच राजु चतुर्कर आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here