आमदार मेघना बोर्डीकर यांना घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

0
513

आमदार मेघना बोर्डीकर यांना घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

आरूणा शर्मा परभणी जिल्हा प्रतिनिधी

आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची जितूरचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी भेट घेतली या भेटीतील प्रमुख 2 राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात यावे.

१) राष्ट्रीय महामार्ग 752-I वाटुर-देवगाव-चारठाणा पाटी-जिंतुर-औंढा-शिरडशहापुर हा 97 कि.मी.लांबी पैकी 27 किमी वाटुर ते चारठाना पाटी पर्यंत कामास मंजुरी देण्यात आली आहे, उर्वरीत शिल्लक 70 किमी रस्त्यास मंजुरी मिळाल्यास विदर्भ व हिंगोली जिल्ह्यातुन येणाऱ्या रा मा.248 ला जाईल व परभणी जिल्ह्याच्या ठिकाणावरून येणाऱ्या रा.मा.क्र 752 K पन जोडला जानार आहे .त्यामुळे ह्या 70 कि.मी.लांबीस मंजुरी देण्यात यावी त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हे तिर्थक्षेत्र राष्ट्रीय माहामार्गाशी जोडले जाईल व मराठवाड्यातील पाचही जिल्हे राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जाऊन मराठवाडा ,विदर्भ व आंद्रप्रदेश मधील दळणवळण सोयीचे होईल.

२) रा.मा.क्र.548 B देवगाव -सेलु-पाथरी इंजेगाव हा महामार्ग सेलु शहरातुन जातो सेलु मध्य मराठवाड्यात नावाजलेली नुतन महाविद्यालयात शिक्षण संस्था आहे या संस्थेत मराठवाड्यातुन व महाराष्ट्राच्या इतर भागातुन विद्यार्धी शिक्षण घेण्यासाठी येतात .तसेत सेलु हे श्री संत साईबाबा यांचे गुरू बाबासाहेब महाराज यांचे जन्मस्थान आहे येथे भावीक भक्त महाराष्ट्रातुन दर्शनासाठी येतात पुढे हा राष्ट्रीय महामार्ग सिमुर गव्हाण व पाथरी येथुन जातो सिमुर गव्हाण येथे स्वामी नरेंद्र महाराज यांचा मठ व पाथरी येथे श्री संत साईबाबा यांचे जन्मस्थळ व पुढे परळी वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे महारष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भावीक येतात त्यामुळे सदर रस्त्यास मंजुरी देण्यात यावी अशी आग्रहाची मागणी केली आहे त्यामुळे दळनवळणास चालना मिळेल ही विनंती करण्यात आली आहे. साहेबांनी सकारात्मक प्रतीसाद देत दोन्ही कामास तात्काळ मंजूरी देण्यात येईल अशी ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here