अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला रस्ता झाला गुळगुळीत

0
393

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला रस्ता झाला गुळगुळीत

गडचांदुर, कवठाळा, भोयेगाव, धानोरा मार्ग पूर्णत्वाच्या दिशेने

 

 

प्रवीण मेश्राम कोरपना
गडचांदुर ते धानोरा हा रस्ता चंद्रपूर व नागपूरला जायला अगदी जवळचा आहे या मध्ये 20/25 किलोमिटर वाचते त्यामुळे नागरिकांसाठी हा रस्ता महत्वाचा होता पण अनेक वर्षा पासून रस्ता अत्यंत खराब व मोठ मोठे खद्दे नी भरलेला होता या रस्त्याने अनेक अपघात झाले अनेकांचे जीव गेले अनेकांवर अपंगत्व सुद्धा आले त्यामुळे अनेक संघटनांनी पक्षांनी आंदोलन करून या रस्त्याला मुजरी मिळवून दिली एका नमंकित कंपनीने हे काम घेतले असून हा रस्ता आता पूर्णत्वास येत आहे यामुळे नागरिकांना चंद्रपूर, घुग्गुस,वणी, भद्रावती, वरोरा नागपूर जाण्यास वेळ व 20/25किलोमिटर सुधा वाचत आहे त्यामुळे नागरिकांची वर्दळ आता याच रस्त्याने राहणार असून नागरिकांनी भोयेगाव ते धानोरा च्या मधात असलेल्या वर्धा नदीच्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे पावसाळ्यात अनेकदा हा मार्ग पुरामुळे बंद होत असतो त्यावर उपाय म्हणून पुलाची उंची वाढवणे हाच एक मात्र मार्ग आहे.

 

 

राजुरा बल्लारपूर मार्गाची वर्दळ होणार कमी – सतिश बिडकर प्रहार जनशक्ती
या मार्गाने हैद्राबाद ते नागपूर तेलंगणातून नागपूरला जाणारी वाहतूक आता याच मार्गाने जाणार अनेक सिमेंट कंपनीचा कच्चा माल व पक्का माल याच मार्गे नागपूर, वणी ,यवतमाळ, चिमूर, वरोरो, चंद्रपूर जायला सोईस्कर मानल्या जात आहे असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे सतिश बिडकर यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here