अहेरी येथील ग्राम शाखा बरखास्त…

0
690

अहेरी येथील ग्राम शाखा बरखास्त…

 

राजुरा, 9 ऑक्टो. : तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुका सुरू असून अहेरी येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रचार बॅनर वर अनधिकृत व बेकायदेशीर मजकूर छापण्यात आला होता. यासाठी ग्रामशाखेने वरिष्ठांशी संवाद न साधता मनमर्जीने कार्य केले. यामुळे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, तालुकाध्यक्ष सुशील मडावी यांनी अहेरी येथील वंचित बहुजन आघाडीची ग्रामशाखा बरखास्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

सविस्तर असे की, अहेरी येथील ग्रामशाखेने ग्रामपंचायत निवडणूक प्रचार बॅनर वर वंचित बहुजन आघाडी, भारतीय जनता पार्टी व गोंडवाना गणतंत्र पार्टी या तीन पक्षांच्या युतीसह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र छापून बॅनर लावला. हि गंभीर बाब वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी या गंभीर प्रकरणाची माहिती तालुका निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस स्टेशन राजुरा येथे देत सदरचे बॅनर खाली उतरवून जप्त करण्याची मागणी केली होती. यानुसार आज तालुका आचार संहिता पथकाने ते अनधिकृत व नियमबाह्य बॅनर काढले.

ग्रामशाखा अध्यक्ष मारोती कोडापे, उपाध्यक्ष दिलीप जुलमे, महासचिव प्रवीण भसारकर, संघटक विठ्ठल उपरे यासह सर्व ग्रामशाखा पदाधिकारी यांना बरखास्त करण्यात आले आहे. पक्ष विघातक कार्य करत पक्षाची प्रतिमा मलिन करत सामान्य जनतेत संभ्रम निर्माण केल्यामुळे अहेरी येथील वंचित बहुजन आघाडीची ग्रामशाखा बरखास्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here