हरदोना खुर्द येथे ज्ञानशाळा उपक्रमातून पार पडली सामान्य ज्ञान स्पर्धा

0
433

हरदोना खुर्द येथे ज्ञानशाळा उपक्रमातून पार पडली सामान्य ज्ञान स्पर्धा

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

कोरोना काळात गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे रखडते शिक्षण लक्षात घेऊन हरदोना खुर्द गावातील समाजकार्याचे शिक्षण घेणारा युवक अक्षय किसन टेकाम याने गावात ज्ञानशाळा सुरू केली . या ज्ञानशाळेत मुलांच्या शिकवणी सोबतच विविध उपक्रम सुद्धा तो राबवत आहे. त्यातीलच एक अनोखा असा उपक्रम म्हणून गावातील ८ वि ते १२ वि पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन दि.२९/१०/२०२० ला करण्यात आले होते याच स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ हा नुकताच ०५/११/२०२० ला पार पडला . या स्पर्धेत गोपाल चवले या युवकाचा प्रथम तर प्रियंका आगलावे वर्ग ७ वा या युवतीचा द्वितीय आणि रुपाली घाटे वर्ग ७ वा या युवतीचा तृतीय क्रमांक आला. सदर स्पर्धेच्याबक्षिस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.अरूनजी मेश्राम सर सचिव ग्रामपंचायत हरदोना खुर्द तसेच श्री शंकरजी टेकाम सरपंच हरदोना खुर्द आणि सौ. ज्योतिताई खंडाळे ( अंबुजा सिमेंट फाऊंडेशन ) यांची उपस्थिती होती . या स्पर्धेप्रसंगी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन च्या माध्यमातून आकर्षक शिल्ड चे वाटप करण्यात आले तसेच ग्रामपंचायत हरदोना खुर्द यांच्या वतीने प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
सादर उपक्रमास गावातील युवक आकाश कातकर , कु.अभिलाषा बोबडे , प्रशांत मोहूर्ले याचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here