भुरट्या चोराच्या वणी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0
604

भुरट्या चोराच्या वणी पोलिसांनी आवळल्या मुसक्या  वणी शहरात मागील काही दिवसात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. पान टपरी व औषधींच्या दुकानातून माल लंपास केला होता. या प्रकरणी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे सराईत आरोपीचा मुसक्या आवळण्यात वणी पोलिसांना यश आले आहे. त्यात 5 चोरीचे गुन्हे उघड झाले असून 27 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सतिश उर्फ शेंबडया बाबाराव मडावी वय 23 रा. दादाबादशाह नगर, राळेगाव या गुन्हेगाराला दि. 20 मे गुरुवारला अटक करण्यात आली. वणी स्थानिक गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी हे शहरात संपत्ती विषयक गुन्हे उघडकीस येण्याचे दृष्टीने पेट्रोलींग करत असतांना गोपनीय माहितीच्या आधारे जत्रा मैदान परिसरात सापळा रचला.

एका पांढऱ्या दुचाकी क्रमांक MH 29-AA 5396 जवळ रेकॉर्ड वरील सराईत चोरटा सतीश मडावी उभा दिसला.एकाही क्षणाचा विलंब न लावता त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याचे जवळून मिळालेली दुचाकी सुद्धा चोरीची असल्याचे उघड झाले. त्याच्या जवळून 7,100रोख मिळाले. ही रक्कम कुठून आली असे विचारताच शहरात रात्रीच्या सुमारास पान टपरी व मेडिकल दुकानात चोरी केल्याचे त्याने सांगितले. आरोपीला ताब्यात घेऊन एक दुचाकी किंमत 20 हजार रुपये व रोख 7 हजार 100 असा एकूण 27 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 गुन्हे उघड झाले आहे. तर विविध कलमा नूसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार यांचे मार्गदर्शनात पोनि वैभव जाधव, पो.उप.नि. गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, विठ्ठल बुर्रेवार, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिपक वन्द्रवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here