जन्मताच ह्दयाला छिद्र असलेल्या ४८ बालकांची नागपूर येथे झाली शस्त्रक्रिया पुर्व तपासणी

0
342

जन्मताच ह्दयाला छिद्र असलेल्या ४८ बालकांची नागपूर येथे झाली शस्त्रक्रिया पुर्व तपासणी

१ ते १० वयोगटातील बालकांची आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने मुंबईत पार पडणार मोफत ह्दय शस्त्रक्रिया

 

जन्मताच हृदयाला छिद्र (ASD-VSD) या हृदयासंबंधी दुर्धर आजाराने अनेक बालके ग्रस्त आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, महागडा उपचार, मोठ्या शहरात राहून उपचार करून घेण्यास येणाऱ्या अडचणी हे ग्रामीण पातळीवरील रुग्ण नातेवाईकांना परवडण्यासारखे नाही. याची माहिती मिळताच विजयभाऊ वडेट्टीवार मित्र परिवाराच्या पुढाकारातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील १ ते १० या वयोगटातील हृदय संबंधी आजारग्रस्त बालकांची जुपिटर हॉस्पिटल ठाणे (मुंबई) येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात करण्याचा निर्धार राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

त्यामुळे या उपक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते. अनेक पालकांनी आपल्या बालकाला पुन्हा जीवनदान मिळावे यासाठी नाव नोंदविले होते.

या उपक्रमांतर्गत नागपूर येथे बालकांची प्राथमिक चाचणी करावयाची होती. चाचणीसाठी चंद्रपुर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांतील विविध भागातून नागपूर येथे पोहचण्यासाठी बालकांच्या कुटुंबासाठी विशेष बसेस सेवेची सोय करण्यात आली होती. तसेच सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण व परत गावी सोडण्यासाठी विजय वडेट्टीवार मित्र परिवाराकडून विशेष व्यवस्था करण्यात आली.

राज्याच्या सीमावर्ती भागातील औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूर तर नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, आदिवासी बहुल जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख असलेल्या भागातील हृदय रोगाशी संबंधित आजाराने ग्रस्त ४८ बालकांची शस्त्रक्रिया पुर्व प्राथमिक तपासणी नागपूर येथे पार पडली. त्यापैकी २६ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी डाॅक्टरांनी पात्र केले असुन इतर रुग्णांना औषधोपचाराचा सल्ला दिला आहे.

यावेळी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयात पोहचुन सर्व रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेत आस्थेने विचारपूस केली.

या बालकांचे पुढील उपचार ठाणे (मुंबई) शहरातील जुपिटर हॉस्पिटल मोठ्या रुग्णालयात मोफत करण्यात येणार असून राबविण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया उपक्रमात आजारग्रस्त रुग्ण व सोबत एक नातेवाईक यांना मुंबई गाठण्यासाठी विमान प्रवास , राहण्याची व्यवस्था , शस्त्रक्रिया व उपचार खर्च, या सर्व सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहे.

हृदयाला छिद्र असलेल्या रूग्णांच्या शस्त्रक्रिया पुर्व तपासणीच्या वेळी शासकीय मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर गुप्ता , स्पेशालिटीचे सर्जन डॉक्टर सतीश दास, डॉक्टर देशमुख व विजय वडेट्टीवार मित्र परिवारातील सहकारी, रुग्णांचे नातेवाईक हे यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here