स्व हरिभाऊ कलोती स्मृतिदिन संपन्न
प्रतिनिधी/सदानंद आ खंडारे

अमरावती : आझाद हिंद मंडळाच्या चे वतीने अमरावती शहराचे अखेर चे लोकप्रिय नगराध्यक्ष व मंडळा चे माजी अध्यक्ष स्व हरिभाऊ कलोती यांचा 40व्या स्मृतिदिन निमित्य अभिवादन सोहळा संपन्न झाला. दरवर्षी ‘आझाद श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते ;परंतु करोना महामारी चे संकट लक्षात घेता या वर्षी घेणे शक्य नव्हते त्यामुळे बुधवारात परिसरातील स्व हरिभाऊ कलोती यांच्या अर्धाकृती पुतळ्याला मंडळाचे कार्याध्यक्ष राजाभाऊ मोरे ,अमरावती चे माजी महापौर विलास इंगोले ,नगरसेवक विवेक कलोती ,मंडळाचे ज्येष्ठ प्रकाश संगेकर ,दिलीप दाभाडे ,दिलीप कलोती, डॉ किशोर फुले यांनी हारपर्ण केले. या वेळी कार्यक्रमाला लक्ष्मण शिरभाते, अण्णा करणे, नितीन इंगोले, बाळू उडाखे, किशोर कलोती ,राजेश जायदे, राजू डांगे ,किशोर बोराटाने ,मुन्ना दुलारे, सुनील तिप्पट ,प्रा गणेश मालोकार ,मनोहर चौधरी ,संजय हिरपूरकर , भूषण पुसतकर,मयूर जलतारे, संतोष चिखलकर, सचिन कोहले ,प्रवीण सोईतकर, अजय पुसतकर, अरुण इंगळे, डॉ आकाश मोरे, उमेश देशमुख, निलेश सराफ,सुशील कथळकर , स्वप्नील गुल्हणे,प्रवीण फुलारी तसेच विदर्भ व अमरावती बॉडी बिल्डिंग असोसिएशन चे विकास पांडे ,संतोष कुकडे , बबलू सोनवणे ,मोहमद नासिर, नागेश डोंगरे ,रॉक विजयकर ,यांच्या सह अनेक खेळाडू व कार्यकर्ते उपस्थितीत होते…