संगमनेर अकोले तालुक्यात गणरायाला भक्ती भावाने निरोप…

0
569

संगमनेर अकोले तालुक्यात गणरायाला भक्ती भावाने निरोप…

 

अहमदनगर
संगमनेर…
(प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील)
संगमनेर , अकोले तालुक्यातील सर्व गणेश मंडळांचे गणपती बाप्पा यांचे विसर्जन मोठ्या उत्साहात व मिरवणुकीने शांतेत पार पडले.सर्व धर्मीयांचा यात प्रामुख्याने समावेश होता.
सोमेश्वर गणपती बाप्पा हा मानाचा गणपती संगमनेर मध्ये असतो. या ठिकाणी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , आमदार सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ तांबे , किशोर पवार, जयंत पवार आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. सोमेश्वर ची मिरवणूक संगमनेर शहरातून निघताच उर्वरित मानाच्या समजल्या जाणाऱ्या गणपतींची अत्यंत शिस्तबद्ध , शांतेत मिरवणुका निघाल्या, ढोल, तासा, मैदानी खेळ, सह झांज पथक , नाशिक ढोल ताशा आदी सवाद्य मिरवणूक होत्या. सर्वच मंडळांनी आवाजाची पातळी शासकीय नियमानुसार ठेवली होती.
सदर मिरवणुकीत नागरिकांचा व सर्वच राजकीय पक्षांचा वाढता प्रतिसाद दिसत होता. दोन वर्षे महामारीने अनेक निर्बंध घालण्यात आले होते. महामारी चे प्रमाण कमी झाले असल्याने तत्कालीन उध्दव ठाकरे सरकारने बरेच नियम शिथिल करून सर्व धर्मीय सन, उत्सव यांना परवानगी दिली होती.
अकोले तालुक्यात ही सगळीकडे मिरवणुका मोठ्या प्रमाणात निघाल्या होत्या. आमदार डॉक्टर किरण लहामटे, लोकनेते सीताराम गायकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कैलासराव वाकचौरे, माजी आमदार वैभव पिचड सह नगराध्यक्ष सोनाली ताई नाईकवाडी , ज्येष्ठ नेते शिवाजी राजे धुमाळ ,प्रकाश नाईकवाडी, वसंत मनकर, मिनानाथ पांडे, विजय सारडा ,अनिल कोळपकर, गणेश कानवडे, मच्छिंद्र धुमाळ, मधुकर नवले , आदी मंडळी विविध ठिकाणी गणेश भक्तांचे स्वागत करताना दिसत होती.
शालेय विद्यार्थी यांचे आकर्षक नृत्य, मैदानी खेळ , विविध वाद्य संगीत ,आदिवासी नृत्य गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत होते.
संगमनेर उपविभाग अधिकारी श्री शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मदने परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. शाखा क्रमांक ११ तर्फे संगमनेर मध्ये कैलास वाकचौरे व सहकारी यांनी सर्व गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला, या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. घारगाव , आश्र्वी, बोटा, कोतूळ, राजूर, शेंडी भंडारदरा, देवठाण, ब्राह्मणवाडा, समशेरपुर आदी मोठ्या गावांनी मिरवणुका शांतेत पार पाडल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here