राजुरा व चुनाळ्याच्या रेतीतस्करांचा नलफडी नाल्यात धुमाकूळ

0
401

राजुरा व चुनाळ्याच्या रेतीतस्करांचा नलफडी नाल्यात धुमाकूळ

 

राजुरा : तालुक्यात संततधार पावसामुळे बहुतेक नाल्यात रेतीचा मुबलक साठा जमा झाला आहे. त्यामुळे रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहे. दरम्यान, नलफडी नाला तस्करांसाठी वरदान ठरत आहे. सध्या या नाल्यात राजुरा व चुनाळयाच्या ६ ते ७ ट्रॅक्टर रेती तस्करांनी धुमाकूळ घालत अवाढव्य उपसा सुरू केला आहे. या तस्करांकडून रात्रभर रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे.

 

“असतानासुध्दा महसूल कर्मचारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संशय बळावला आहे. सध्या या तस्करांवर ‘वर्गणी  मुळे गणेशजींची कृपा दिसून येत आहे.”

 

नलफडी नाला जंगलाला लागून असल्याने नाल्यात बारीक व दर्जेदार रेती जमा झाली आहे. त्यामुळे या नाल्यावर रेती तस्करांची नजर पडली आहे. आजघडीला या नाल्यात राजुरा व चुनाळयाच्या ६ ७ रेती तस्करांनी धुडगूस घातला आहे. सध्या या तस्करांनी अंधाराचा फायदा घेत रात्रभर चोरटी वाहतूक सुरू केली आहे. याकरिता नाल्यात मोठमोठे खड्डे खोदण्यात येत आहे. अवाढव्य रेती उपस्यामुळे नाल्याच्या अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या या तस्करांवर गणेशजीची कृपा दिसून येत आहे. पाच हजाराच्या वर्गणीमुळे तस्करांना खुली सूट देण्यात येत असल्याची चर्चा आहे. रेतीचोरीचा गोरखधंदा मागील काही दिवसांपासून सर्रासपणे सुरू आहे. पण ते आजतागायत या तस्करांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या ढिलाईमुळे शासनाला लाखोंच्या महसुलावर पाणी फेरावे लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here