भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना तालुका सावलीच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन
सावली तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन….

तालुकाप्रतिनिधी बंडू मेश्राम
तालुक्यात भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना सावली च्या वातीने दिव्यांग, अंध, विधवा, निराधार, या सर्वांच्या हितासाठी तहसील कार्यालय सावलीवर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. देशात मागील अनेक दिवसांपासून कोरोना (कोविड 19) च्या प्रकोपमुळे देशात अनेक लोकांना संकटाना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून निराधार योजनेचे प्रलंबित हप्ते यामुळे तालुक्यातील दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय सावली येथे विविध मागण्यांसाठी एक दिवशीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. शासनाने दिव्यांग कल्याणासाठी अनेक शासन निर्णय काढलेत पण अमलबजावणी मात्र होतांना दिसत नाही. लॉकडाऊनमुळे मागील 5 ते 6 महिन्यापासून दिव्यांग, अंध, निराधार, विधवा, वृद्ध यांच्या प्रलंबित हप्त्यामुळे त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व अन्य योजनेमध्ये 1000 ऐवजी 3000 रुपये प्रतिमाह देण्यात यावे. तसेच संबधित योजनेचे पेन्शन तात्काळ जमा करण्यात यावे. दिव्यांगाचे कर्ज माफ करावे.दिव्यांगाना प्राधान्याने विनाअट घरकुल देण्यात यावे तसेच त्यांना अंत्योदय यादीत समाविष्ट करून घ्यावे. शासन निर्णयनुसार गृहकरात 50% सवलत देण्यात यावे. दिव्यांग, वृद्ध, निराधार, विधवा यांना 5000 रुपयाची तात्काळ मदत करावी. अशा अनेक मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा, तालुका अध्यक्ष नरेंद्र डोहणे, सचिव मनोज शेंडे, महासचिव जनार्धन गेडाम, सहसचिव भूषण चिलकेवार, तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी, बहुसंख्येने दिव्यांग, विधवा, निराधार, वृद्ध यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.