पोस्ट ऑफिस टेंबुरवाही येथे वीस लाखांचा घोटाळा…

0
972

पोस्ट ऑफिस टेंबुरवाही येथे वीस लाखांचा घोटाळा…

 

चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस महासचिव तथा टेंबुरवाही चे उपसरपंच चेतन जयपूरकर यांची संबंधित दोषींवर योग्य कार्यवाहीची मागणी…

 

 

 

राजुरा : तालुक्यातील टेंबुरवाही येथील भारतीय डाक विभाग खातेधारकांच्या रकमेच्या अफरातफरीची चौकशी करून सबंधित दोषी कर्मचाऱ्यावर योग्य कार्यवाही करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव तथा टेंबुरवाहीचे उपसरपंच चेतन जयपूरकर यांनी मध्य चांदा डाक विभाग चंद्रपूरचे प्रवर अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

टेंबुरवाही येथे भारतीय डाक विभाग खातेदारांचे आरडी, एसबी, आरपीएलआय, एमआय, पीएलआय, सुकन्या खात्यांची अंदाजीत रक्कम रुपये 20 लाख अफरातफर केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. येथील खातेधारकांनी संबंधितास वारंवार विचारणा केली असता नेटवर्क अडचण व पासबुक तपासणी करिता चंद्रपूर डाक विभागाला पाठविले आहे, असे पोस्टमन (मेन डिलिव्हरी एजंट/MD) पराग भेंडारे यांच्याकडून सांगण्यात येत होते.

मागील तीन ते चार महिन्यांपासून खातेदारांची दिशाभूल करून स्वतःच्या मनमर्जीने भेंडारे रकमेची उचल करीत होता. हा सगळा भोंगळ कारकार टेंबुरवाही येथे संबंधित डाक विभागाचे वरिष्ठ अधिकारी भेटी करता आले असता 50 ते 60 खातेदारांच्या रकमेची झालेली अफरातफर उजेडात आली. सध्या सदर कर्मचारी भेंडारे बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत असून यात टेंबुरवाही, सोनुर्ली, सिर्सी, बेरडी, तुलाना, चिचबोडी येथील खातेदारांची रक्कम गहाळ असल्याची माहिती आहे. तरी सदर कर्मचारी भेंडारे यांचा शोध घेऊन खातेदारांची रक्कम परत करावी व दोषीवर योग्य कार्यवाहीची मागणी जयपूरकर यांनी केली आहे.

सदर तक्रार माहितीस्तव राजूरा चे आमदार सुभाष धोटे, खासदार बाळू धानोरकर, उपविभाग डाक कार्यालय राजुरा, ठाणेदार पोलीस ठाणे विरुर यांना देण्यात आली असून हा सगळा पोलीस डाक कार्यालयाचा सावळा गोंधळ चौकशीअंती पुढे येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here