भिम आर्मी निराधार वृद्ध महिलेच्या मदतीला धावली

0
787

भिम आर्मी निराधार वृद्ध महिलेच्या मदतीला धावली

 

कोठारी, राज जुनघरे
“अन्न – कपडा – निवारा” या मानसाच्या तिन मुलभुत गरजा मानल्या जातात. दिन दुबड्या, गरीब व लाचार लोकांसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी योजनांचा लाभ पदरी पाडून घेण्यासाठी निराधार वृद्ध लोकांना संघर्ष व अनाठायी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. पदरी निराशा आली की भुकबळी सारखे प्रकार घडत असतात. अशीच प्रचिती कोठारीत समोर आली. आणि भिम आर्मी च्या पदाधिकार्यांनी निराधार, निराश्रित वृद्ध महिलेची दखल घेत मदतीसाठी धावली.

स्थानिक आनंद नगर स्थित नजमा वंजारी या वृद्ध निराधार महीलेची जीवन जगण्यासाठी चाललेली धडपड पाहता व शासकीय योजनांचा लाभ मिळवून घेण्यासाठी होणारी पायपीट लक्षात घेऊन भिम आर्मी चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नजमा या वृद्ध महिलेचे घर गठले. सदर वृद्ध महिलेच्या निवासाची, परिस्थितीची पाहणी केली. समस्या जाणून घेतल्या आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कार्यकर्त्यांचे मन पाझळले. वृद्ध महिलेच्या परिस्थितीची दखल घेत आर्थिक मदत, शासन दरबारी पाठपुरावा करून निराधार व कुटुंब अर्थसहाय्य आणि शासकीय घरकुलाचा लाभ मिळवून देण्याचा निरधार केला.

यावेळी भिम आर्मी चे चंद्रपूर जिल्हा सचिव राज जुनघरे, जेष्ठ पत्रकार सुरेश रंगारी, बल्लारपूर व गोंडपिपरी संयुक्त तालूका प्रभारी प्रमोद कातकर, बल्लारपूर तालुका उपाध्यक्ष अनिल वनकर, बल्लारपूर तालुका महासचिव संदीप मावलीकर, शाखा अध्यक्ष सुरज रामटेके, कार्याध्यक्ष युगल तोडे, पंकज जावलिकर, सागर मुरमाळकर, महासचिव सचिन रायपूरे, सहसचिव अमित चंदावार, प्रवक्ते भारत खोब्रागडे, सम्यक पेटकर, अंकीत झाडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here