गडचांदूर येथील मोकाट जनावरांचा जनतेला नाहक त्रास

0
398

गडचांदूर येथील मोकाट जनावरांचा जनतेला नाहक त्रास

दुचाकी, चार चाकी वाहने रस्त्यावर चालणे झाले अवघड

 

 

कोरपना प्रतिनिधी
औद्योगिक नगरी गडचादुर येथील मुख्य मार्गावरील अनेक मोकाट जनावरे रस्त्यावर बसून असतात या मोकाट जनावराना राखनित टाकण्यास अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदने दिली पण परिष्टीती जेसे थी .यातच मुख्य बाजार पेठ आठवडी बाजार येथे प्रत्येक मंगळवार ला मोठ्या प्रमाणात बाजार भरत असतो यात मोकाट जनावरे रस्त्याच्या अनेक बाजूला फिरत असतात बाजार करण्यास गेलेल्या लोकांच्या अंगावर जातात काही तर जखमी सुधा झाले .या अश्या मोकाट जनावरांचा नगर परिषद नी बंदोबस्त करावा व जनतेला होणारा त्रास यापासून सुटका करण्यात यावी अशी गडचांदूर येथील जनतेची रास्त मागणी आहे.यातच हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने अनेक वाहने मोठ्या प्रमाणात याच मार्गांनी जात असतात रहदारी मोठ्या प्रमाणात असून वाहन चालकांना व जनतेला याचा त्रास सहन करावा लागतो.यातच शाळकरी मुलांना सुद्धा यांचा त्रास होतो. ही मोकाट जनावरे रस्त्याच्या अनेक भागात पूर्ण रस्ता घेऊन बसून असतात. त्यासाठी वाहन चालकांना आपले वाहन कुठून काळावे हा प्रश्न पडतो व पायदळ चालणाऱ्या जनतेला सुधा यांचा त्रास होतो. पण नगर परिषद या कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे येथील जनतेची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here