निराधार लाभार्थांचे प्रलंबित अनुदान तत्काळ मिळवून देण्यास तहसीलदार कडे ब्रिजभूषण पाझारे यांची मागणी

0
432

निराधार लाभार्थांचे प्रलंबित अनुदान तत्काळ मिळवून देण्यास तहसीलदार कडे ब्रिजभूषण पाझारे यांची मागणी

प्रलंबित अनुदान मिळल्यास आर्थिक सहाय्य होईल, तत्काळ अनुदान देण्यास पाझारे यांची मागणी

 

 

चंद्रपूर जिल्हातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थांचे मागील जून ते सप्टेंबर महिन्यापासूनचे अनुदान प्रलंबित आहे. लाभार्थाना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या मासिक अनुदानातून उदरनिर्वाह करण्यास उपयुक्त असतो. परंतु एप्रिल मे व जून महिन्यापासून अनुदान प्राप्त झाले नसल्यामुळे निराधार व्यक्तीना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे.

निराधार व्यक्तीचे मिळालेल्या रकमेतून औषध तसेच दैनदिन जीवनात असलेल्या वस्तू खरेदी साथ मोठे सहाय्य होत असते. त्यार्थी मागील ३ महिन्यापासून अप्राप्त अनुदानामुळे त्यांचावर आर्थिक संकट ओसळले आहे. तेव्हा प्रलंबित निराधार अनुदानाच्या विषयाबाबत माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी तहसीलदार कार्यालयात हजेरी लावली.

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थाना प्रलंबित असलेले एप्रिल मे व जून महिन्यापर्येत्नचे एकत्रित अनुदान लाभार्थाना देण्यात यावे, याकरिता पाझारे यांनी तहसीलदार यांच्या कडे मागणी केली. लाभार्थाना लवकरच प्रलंबित अनुदान प्राप्त होईल अशी माहिती तहसीलदार यांनी दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here