आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १३१ व्या जयंती निमित्त मसाला भात व शरबत वाटप

0
397

आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १३१ व्या जयंती निमित्त मसाला भात व शरबत वाटप

 

 

चंद्रपूर :- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महिला अध्यक्षा सुनिता ताई पाटील यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने शहराच्या मुख्य आंबेडकर चौकात भव्य पेडांल उभारुन माहामानव बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली व मसाला भात तथा शरबत वाटप करन्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली सत्ता स्थापन करण्यासाठी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. सध्या व्यवस्था परिवर्तनाची खरी गरज आहे बाबासाहेबांच्या अनुयायांनी आम आदमी पार्टीचे हात बळकट करण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाचे लढ्यात सामील व्हावे व बाबासाहेबांचे स्वप्न साकार करावे असे जयंती दिनी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांनी आवाहन करन्यात आले.

 

 

बाबा तेरा सपना अधुरा, आम आदमी करेगी पूरा” अशा घोषणांनी परिसर दणानुन गेला कार्यक्रमाला यशस्वी करन्यासाठी राजेश‌ चेडगुलवार आणी सिकंदर सागोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी भिवराज सोनि , दिलीप तेलंग, राजू कुडे, कालिदास ओरके, प्रशांत रामटेके, राहुल ठावरी, मनोहर पाटील, निलेश रामटेके, राजकुमार कांबळे, दिलेश पाटील, निलेश मून , चैतन्य पाटील, प्रणय पाटील, सनद पाटील, नंदलाल पाटील, प्रमोद चिवंडे, संजय भ्रामने, कुणाल माते, योगेश आपटे, संदीप तुर्क्याल, सुखदेव दारुण्डे, संतोष बोपचे, भीमराव मेंढे , निखिल बारसागडे, पपू पाझारे, गोकुल बनसोड, मंगला मुक्के , शबनम शेख, रूपा काटकर, सुजाता बोदेले, आरती आगलावे, इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here