प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात नवराष्ट्र निर्मितीची क्षमता – आ. किशोर जोरगेवार

0
416

प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात नवराष्ट्र निर्मितीची क्षमता – आ. किशोर जोरगेवार

आमदार किशोर जोरगेवार यांनी केले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखणीच्या बळावर, सामाजिक, राजनीतिक, धार्मिक, अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणल्या त्यांनी दिलेल्या स्वातंत्र, समता, बंधूत्व या त्रिसुत्रीमुळे समाजातील सर्व घटकाला समान न्याय मिळू शकला त्यांच्या याच देशपयोगी विचारात नवराष्ट्र निमिर्तीची क्षमता असल्याचे मनोगत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ती आमदार किशोर जोरगेवार यांनी गांधी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत त्यांना अभिवादन केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन महिला शहर संघटिका विमल कातकर, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, वैशाली रामटेके, वैशाली रत्नपारखी, सुशील वाकडे, युवा नेते अमोल शेंडे, विश्वजीत शाहा, जितेश कुळमेथे, दुर्गा वैरागडे, सायली येरणे, आशा देशमुख, मुन्ना जोगी, निलीमा वनकर, माधूरी निवलकर आदिंची उपस्थिती होती.

 

शिक्षण हे वाघीनीच दुध आहे. असे सांगत समाजातील दलीत व शोषीत वर्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाप्रती जागृत केले. भारत देशाला प्रगतशील आणि सर्वसमावेशक संविधान त्यांनी बहाल केले. याच संविधानावर आज देश चालत असून तो एकसंघ राहला आहे. आज त्यांची जयंती साजरी करत असतांना त्यांना अपेक्षीत अशा समाज निमीर्तीसाठीही आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. असे मनोगत यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here