योग म्हणजे काय 

0
495

   योग म्हणजे काय

योग दिन का साजरा केला जातो ?

 

पांढरकवडा तालुका प्रतिनिधी ✍🏻 गुरूबचनसिंग जुनी 

 

 आजचा दिवस म्हणजे 21 जून हा दिन उत्तर गोलार्ध मध्ये आपण राहतो त्या सगळ्यांसाठी सगळ्यात मोठा दिवस असतो म्हणून हा दिवस साजरा होतो किंवा पाळला जातो .योग करण्यासाठी किंवा योग साधनेसाठी आजचा दिवस भौगोलिक रित्या सुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो म्हणून 21 तारीख योग दिनासाठी निवडली गेली आहे.

योग मुळे आपल्या अवयवा मधीलच नाही तर शरीर मन आत्मा यांच्यामध्ये सुद्धा संतुलन योगामुळे राखले जाते,  योगामुळे शारीरिक मानसिक विकारांवर विजय मिळावा जाऊ शकतो.

योग म्हणजे काय ?

 

‘योग:स चित्तवृत्ती निरोध:’

 

म्हणजे मनाला स्थिर करणे म्हणजे योग !

योग या शब्दाचा अर्थ ‘जोडणे’ हा आहे,  म्हणजेच आपले शरीर मन आणि आत्मा ह्या योग केल्याने जोडले जातात यालाच योग असे म्हणतात. तसेच योगामुळे आपले शरीर मनाला  अध्यात्म आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्ती लाभते आणि आपले आरोग्य निरोगी होते .

आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे “घरी योग आणि कुटूंबासह योग”.  आपणास माहित आहे की संपूर्ण जग कोविड -१९ साथीच्या आजारातून जात आहे आणि जवळजवळ प्रत्येक देशाने  लॉकडाउन लादले आहे.  लोक व्यायामासाठी किंवा योगासाठी बाहेर जाणे कठीण किंवा अशक्य आहे.  आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 थीम लोकांना घरी प्रेरित राहण्यास आणि व्यायाम आणि योगाद्वारे निरोगी जीवनशैली अवलंबण्यास प्रेरित करते.  व्यायामामुळे लोकांना आशावादी राहण्यास मदत होते आणि योगासने बाहेर न जाता वेळ घालवण्यासाठी आणि पैसे कमविण्यासाठी नवीन कल्पनांचा शोध घेण्यास मदत करते.  अशा प्रकारे या योग दिनाचे ठिकाण म्हणजे आपले घर.  आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रशंसा करू या आणि हा कोरोना संपेपर्यंत घरी योगाचा अभ्यास करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here