विशिष्ठ कंत्राट दारालाच का मिळतात तालुक्यातील ग्राम पंचायतीचे बांधकामे ?

0
655

विशिष्ठ कंत्राट दारालाच का मिळतात तालुक्यातील ग्राम पंचायतीचे बांधकामे ?

ग्रामपंचायतीच्या ई निविदा प्रणालीत घोळ 
शासनाचे संकेतस्थळ कंत्राटदाराच्या ताब्यात 

बल्लारपूर तालुका प्रतिनिधी :- राज जुनघरे
बल्लारपूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था च्या माध्यमातून होत असलेल्या कामाच्या ई निविदा कार्यक्रम मागिल अनेक वर्षांपासून कंत्राटदाराचे मनमर्जीने होत आहे. त्यातच शासनाचे संकेतस्थळावर ग्रामपंचायत ऐवजी कंत्राटदारच एका खाजगी केंद्रावरून ई निविदा अपलोड करीत असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.यामुळे ई निविदा प्रक्रिया फक्त नावापुरतीच असल्याचे बोलले जाते. अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने ई निविदाचा घोळ सुरू असल्याचे सांगितले जाते. गाव विकासाच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाचे घटक आहे. यासाठी शासनाकडून येणाऱ्या योजना व त्यातील निधीचा विनियोग संस्थांच्या माध्यमातून व्हावा. त्यातही पारदर्शकता राहावी, या हेतूने राज्यशासनाकडून ई निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

 

शासन नियमानुसार तीन लाखांहून अधिक निधीच्या कामाची निविदा ई प्रणालीतून प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे. या नुसार बल्लारपूर तालुक्यात १७ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली जात आहेत. पण ग्रामपंचायतीत कार्यरत सचिवांना शासनाचे संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरीने निविदा संदर्भातील इंतभूत माहिती तसेच निविदेचा कार्यक्रम अपलोड करता येत नसल्याने काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या मदतीने निविदेचे कार्यक्रम संकेतस्थळावर टाकले जात आहे.यासाठी एका निविदेला दोन हजार रुपये आकारले जात असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, जोपर्यंत संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव या दोघांचे डिजिटल स्वाक्षरी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत निविदा अपलोड करता येत नाही. मात्र कंत्राटदाराचे त्या खाजगी केंद्रावर बेकायदेशीर रित्या गहाण ठेवले जाते. त्यानतंर संबंधित व्यक्ती आपले मनमर्जीने त्या डिजिटल स्वाक्षरीचा उपयोग करून संकेतस्थळावर निविदेचा कार्यक्रम प्रसिद्ध करतो.

 

प्रसिध्द झालेल्या निविदेचा कार्यक्रम संबंधित कंत्राटदारालाच माहिती असल्याने ते काम आपले पदरी पाडून घेतले जाते. असे प्रकार तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या ई निविदा प्रक्रिया शासनाचे संकेतस्थळावर ई निविदा अपलोड करण्याचा गोरखधंदा कंत्राटदाराचे माध्यमातून होत असल्याचे बोलले जाते. तालुक्यात ३ -४ वर्षांत ग्रामपंचायत मार्फत केलेली विकासकामे आणि त्यासाठी राबविण्यात आलेली ई निविदा प्रक्रिया याची शासनाने चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ई निविदा घोळ तालुक्यात उघडपणे सुरू असतांनी अधिकारी या प्रकाराला लपविण्याचा प्रयत्न करित आहेत. ही यंत्रणा संशयाचे भोव-यात असून या प्रकरणाचे विकासकामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सर्वसामान्य लोकांना दिसत आहे.खाजगी केंद्रातून का होते ई निविदा अपलोड ?बल्लारपूर तालुक्यात सुरू असलेल्या ई निविदा अपलोड घोळ यासंदर्भात पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्याशी विचारपूस केली असता, एका खाजगी केंद्राचे माध्यमातून ई निविदा अपलोड केली जात असल्याची माहिती दिली. त्यामुळे पंचायत समिती बल्लारपूर अंतर्गत होत असलेल्या ई निविदा प्रक्रिया कंत्राटदाराचे ताब्यात असल्याची बाब समोर आली.

 

सचिवांमध्ये का आहे प्रशिक्षणाचा अभाव ?
ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती प्रशासनाने आपले कार्यालयातूनच ई निविदा प्रक्रिया व त्या बाबतीतील संपूर्ण माहिती अपलोड करणे बाबत योग्य प्रशिक्षण दिले नसल्याने अतिशय गोपनीय असलेली माहिती ग्रामसेवक त्या सेतू केंद्रातील कर्मचा-यांना व कंत्राटदाराला हाताशी धरून त्यांचेकडून सदर कामे करून घेतात. त्यातच हा ई निविदेचा घोळ होत असल्याने सरपंचाचे मर्जीतील कंत्राटदाराला काम दिले जाते. अनेक सरपंच ग्रामसेवकावर दबाव आणून स्वत: काम करवून घेतात. असे अनेक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी दबक्या आवाजात आपले मत व्यक्त केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here