यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घुग्घूस येथे चष्मे वाटप तर मोतिया बिंदूच्या ६८ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

0
412

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घुग्घूस येथे चष्मे वाटप तर मोतिया बिंदूच्या ६८ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

 

 

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घुग्घूस येथे २७ मार्चला नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरातील पात्र ९२४ रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले तर सदर शिबिरात तपासणी झालेल्या ६८ रुग्णांवर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात मोतीया बिंदुची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

सदर चष्मे वाटप कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे घुग्घुस शहर संघटक विलास वनकर, युवा नेता इमरान खान, स्वप्निल वाढई, मयुर कलवल, घुग्घुस बहुजन महिला शहराध्यक्ष उषा आगदारी, आदिवासी महिला शहर प्रमुख उज्वला उईके, सुनिता चुने, कामिनी देशकर, नितु जयस्वाल, स्मिता कांबळे, यशोधरा पाझारे, गिता बोबडे, माया मांडवकर, कांता बाग, निर्मला दीप, वनिता निहाल, विना गुच्छाईत, विनोती बाग आदिंची उपस्थिती होती.

घुग्घुस येथील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने २७ मार्चला यंग चांदा ब्रिगेडच्या घुग्घुस येथील कार्यालयात नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या जवळपास १२०० नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला होता. या शिबिरात पात्र रुग्णांना चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन आज घुग्घूस येथे करण्यात आले होते. यावेळी ९२४ चष्मांचे वितरण रुग्णांना करण्यात आले. तर सदर शिबिरात मोतियाबिंदुच्या शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या ६८ रुग्णांवर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here