विग्नोज राजूरकर यांचे हृदयविकाराने निधन

0
267

विग्नोज राजूरकर यांचे हृदयविकाराने निधन

 

राजुरा : शिवसेनेचे माजी राजुरा तालुका प्रमुख विग्नोज विष्णू राजूरकर (वय ३४ वर्षे) यांचे आज (दि १२) रोज शुक्रवारला रात्री २ वाजता कान्हाळगाव येथे त्याचे सासरे विजू मसे यांचे घरी निधन झाले.
अगदी कमी वयात राजकीय क्षेत्रात नावलौकीक झालेल्या विग्नोज यांना सामाजिक कार्यात आवड असल्याने त्यांनी मराठा सेवा संघात जिल्हास्तरावर काम केले त्यानंतर शिवसेनेचे राजुरा तालुका प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. अल्पावधीत जिल्ह्यात नावलौकीक झालेला विग्नोज हृदयविकाराच्या झटक्याने काळाच्या पडद्याआळ झाला. त्यांच्या पश्च्यात पत्नी, आई, वडील, भाऊ व आप्त राजूरकर परिवार असून राजूरकर परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
त्यांचे मूळ गाव पेल्लोरा येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी शोकसभेला काँग्रेस ओबीसी विभाग सेलचे प्रदेश सरचिटणीस उत्तम धांडे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सरिताताई कुडे, सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक सुभाष मसे, मुख्याध्यापक मनोज पावडे, रामपूरच्या सरपंच वंदनाताई गौरकार, सेवानिवृत्त प्राचार्य जोगी, शेतकरी संघटनेचे अरुण नवले, माजी सरपंच रमेश कुडे, नामदेव गौरकार, सास्तीचे नरसिंग मादर उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here