लक्कडकोट-सोंडो राज्य महामार्गावर अपघात

0
759

लक्कडकोट-सोंडो राज्य महामार्गावर अपघात

■ सोंडो येथे पुलावरून नाल्यात पडली कापसाची वाहतूक करणारी चारचाकी

लक्कडकोट : लक्कडकोट चेक पोस्ट वरून कापसाची वाहतूक करणारी मालवाहक गाडी क्र. टीएस 02 युबी 0302 सोंडो येथील पुलावरून नाल्यात कोसळली. सुदैवाने यात जीवित हानी टळली. चालक-मालक जाकीर सय्यद हे सुखरूप बचावले. चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पुलाखाली जाऊन नाल्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ओव्हरलोडिंग मालवाहतुकीने चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. लक्कडकोट चेक पोस्ट वर संबंधित ओव्हरलोड वाहनांची तपासणी योग्यरितीने झाल्यास अशा ओव्हरलोड वाहनांचे अपघातास आळा बसेल अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

■ खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत

राजुरा तालुक्यातील लक्कडकोट असिफाबाद राज्य महामार्गावर पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडामुळे व संबंधित विभागाच्या ढिसाळ कार्यप्रणालीमुळे प्रवाशांना दैनंदिन अपघाताला सामोरे जावे लागत आहे. गेंड्याच्या कातडीच्या संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र संबंधित विभागाला केव्हा जाग येईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here