घुग्घुस न. प. चे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांचे निलंबन काँग्रेसला झोंबले

0
527

घुग्घुस न. प. चे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांचे निलंबन काँग्रेसला झोंबले

 

 

नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांना निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.
कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून त्यांचे निलंबन झाले.
घुग्घुस न. प. चे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांचे निलंबन काँग्रेसच्या नेत्याला चांगलेच झोंबल्याचे दिसते.

घुग्घुस न. प. चे तत्कालीन मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांनी केला. म्हणे शासकीय कार्यक्रम नसल्यामुळे न. प. ला याची कल्पनासुद्धा नव्हती. याबाबत मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर सुद्धा अनभिज्ञ होते. असे वृत्त प्रसार माध्यमातून प्रकाशित करण्यात आले.

२६ ऑगस्ट रोजी अमराई वार्डात भुस्खलनाची घटना घडली. १६० भुस्खलनग्रस्त कुटुंबियांना धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी १० हजार रुपये आर्थिक मदत राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री यांच्या हस्ते देण्यासाठी ८ सप्टेंबर रोजी कार्यक्रम घेण्यात आला होता. कुटुंबियांच्या नावाचे १६० धनादेश नगर परिषदेच्या ताब्यात होते.

परंतु घुग्घुस न. प. चे तत्कालीन मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांच्या बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा मुळे धनादेश वाटपाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मंत्री महोदयांना व १६० कुटुंबियांना ३ तासाहून अधीक काळ वाट पाहावी लागली. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याने न. प. चे तत्कालीन मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांना निलंबित करण्यात आले.

अमराई वार्डातील स्थलांतरित कुटुंबियांना घरभाड्याचे पैसे वाटप करण्यात येईल हे सांगण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या सोबत न. प. चे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर हे जि.प. शाळेत गेले होते.

तो काँग्रेसचा कार्यक्रम होता का ? किंवा शासकीय कार्यक्रम होता ? याबाबत हि तत्कालीन मुख्याधिकारी अनभिज्ञ होते का ? असा खडा सवाल भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी उपस्थित केला असून तत्कालीन मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांचे निलंबन काँग्रेसच्या नेत्यांना का झोंबले ? असे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here