सेट उत्तीर्ण नानेश्वर धोटे यांचा राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालय गडचांदूर तर्फे सत्कार

0
418

सेट उत्तीर्ण नानेश्वर धोटे यांचा राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालय गडचांदूर तर्फे सत्कार

 

युजीसी अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या वतीने 26 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरी सेट परीक्षेत नानेश्वर धोटे यांनी सुयश संपादन केले आहे. त्या निमित्य राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालय गडचांदूर तर्फे नानेश्वरचा सत्कार करण्यात आला.
सत्कार कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाचे ग्रंथपाल नानेश्वर रोहणे, संतोष कंठाळे, डॉ. महेश हिरादेवे, डॉ. निरंजने, मंगेश रणदिवे, श्रीकांत घोरपडे, आशिष गोडशिलवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.
नानेश्वर याने राज्यशात्र विषयात एम ए नागपूर येथून पूर्ण केले असून त्याने याचे श्रेय आपल्या कुटुंबातील सदस्य व मित्र परिवार तसेच नेहमी पाठीशी राहणारे त्यांचे मोठे भाऊ जानेश धोटे यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here