अपस्मार ने घेतला युवतीचा आकस्मिक बळी

0
969

अपस्मार ने घेतला युवतीचा आकस्मिक बळी

 

राजुरा, 5 फेब्रु. : काल इंदिरानगर येथे स्वतःच्याच घरी 30 वर्षीय युवतीचा पाळण्याच्या दोरखंडात अडकून जीव गेल्याची घटना उघडकीस आली. हि घटना साडे अकरा वाजता घडली. यामुळे ‘हत्या की आत्महत्या’ अशा चर्चा ऐकण्यात आल्या. मात्र हा एक अपघात असून यात अपस्मार (फिट) या बिमारीने युवतीचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे.

इंदिरानगर येथील रहिवासी सुरेखा विठ्ठल सोयाम ही घरासमोर बसून नखे काढत होती. ती घरात गेली असता तिला अचानक अपस्मार (फिट) चा दौरा आला. यामुळे ती घरात तिच्या भाच्यासाठी बांधलेला पाळण्याच्या दोरखंडात गळा आवळला गेल्याने आकस्मिक तिचा जीव गेला. दौरा इतका भयंकर होता की सदर युवतीचा दातात जीभ सापडल्याने रक्तस्त्राव झाला. तिच्या मागे आई, लहान भाऊ, वहिनी व भाचा असा परिवार असून घरात कोणी उपस्थित नसल्याने आकस्मिकरित्या जीव गेला. पुढील तपास राजुरा पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here