बारावी परीक्षेसंदर्भातील निर्णय अनपेक्षित; विद्यार्थ्यांचा सुर

0
484

बारावी परीक्षेसंदर्भातील निर्णय अनपेक्षित; विद्यार्थ्यांचा सुर

बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होतील, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले होते. मात्र सीबीएससी बोर्डाच्या पाठोपाठ एचएससी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देत, सदर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेविणा पास झाल्याचा आनंद होत असला तरी, बारावी परीक्षेसंदर्भातील निर्णय अनपेक्षित असून गेल्या वर्षभरापासून अहोरात्र मेहनत घेत केलेल्या अभ्यासाची फलश्रुती अशी मिळेल, हे कल्पनेबाहेर होते असल्याचे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

—————————————–
गेल्या दिड-दोन वर्षात जे शैक्षणिक नुकसान झाले, ते भरून न निघणारे आहे. ‘परिक्षेविणा पास होणे’ हे तत्त्वात बसत नसले, तरी हा निर्णय स्वीकारावा लागतोय. माझ्या समवेत असंख्य समवयस्कर मित्रांचा ‘उद्या’ कसा असेल? कल्पनाच नाही!

– आदित्य आवारी, विद्यार्थी
—————————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here