संविधानाचा अपमान करणार्या प्रविण तरडे यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

0
381

संविधानाचा अपमान करणार्या प्रविण तरडे यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा चे पोंभुर्णा पोलिस स्टेशन ला निवेदन

लोकेश झाडे

पोंभुर्णा :- भारतीय संविधानाचा अपमान करणारा प्रविण तरडे यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तालुका वंचित बहुजन आघाडी ने पोंभुर्णा ठाणेदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
भारताची राज्यघटना देशासाठी सर्वोच्च आहे.याचा मान राखणे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आहे.मात्र दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी भारतीय संविधानावर गनपतीची स्थापना केली आहे.भारतीय संविधानानुसार संविधान व भारत धर्मनिरपेक्ष आहे.धार्मिक कार्यक्रमात राज्यघटना वापरता येत नाही ते चुकीचे आहे असे असताना संविधान गणपतीचा पाठ समजून तरडे यांनी भारतीय संविधानाचा अपमान केला आहे.त्यामुळे समस्त भारतीयांच्या भावना दुखावल्या असुन सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रविण तरडे यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मागणी वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा नि पोंभुर्णा पोलिस निरीक्षक नाईकवाळ साहेब यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदन देताना चंद्रहास उराडे तालुका अध्यक्ष,रवि तेलसे तालुका महासचिव,श्यामकुमार गेडाम जिल्हा सदस्य,अतुल वाकडे तालुका अध्यक्ष युवा आघाडी,राजु खोब्रागडे शहर अध्यक्ष, अविनाश वाळके जिल्हा प्रमुख आयटि सेल, लोकेश झाडे तालुका अध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन, प्रणीत मानकर चंद्रपुर शहर अध्यक्ष, जगजिवन उराडे, सुनील दुर्गे,पराग उराडे ईत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here