खांबाडा येथे गळफास लावून इसमाची आत्महत्या

0
673

खांबाडा येथे गळफास लावून इसमाची आत्महत्या

 

चिमूर/तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या खांबाडा येथील रहीवासी वसंता विठोबा पडाल वय ५५ वर्ष यांनी १२ मे च्या पहाटेला आपल्याच शेतात गळफास लावून आत्महत्या केली.

ही घटना घरच्यांना कळताच लगेच चिमुर पोलीस विभागाला पाचारण करण्यात आले. ही घटना पहाटे ५ वाजता घडली.

वसंता विठोबा पडाल यांनी घरामागील शेतात झाडाला दोरखंड बांधून गळफास लावुन आत्महत्या केली. ते पी.डब्लु.डी. मध्ये रोजंदारीने कामाला होते. आत्महत्येचे नेमके कारण काय हे मात्र कळु शकले नाही.

त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, तीन विवाहित मुली असा बराच मोठा आप्त परीवार आहे. पुढील तपास चीमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज गभने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here