पत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा…!

0
844

पत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा…!

● वंचित बहुजन आघाडी राजुराची मागणी

● राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मार्फत पोलीस निरीक्षक नागपूर यांना निवेदन सादर

 

राजुरा, 4 फेब्रु. : 25 जानेवारीला पंचायत समिती समोरील चौकात नवभारत प्रतिनिधी तथा पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष यांच्यावर चार ते पाच युवकांनी जीवघेणा भ्याड हल्ला चढविला. यात पत्रकाराला जबर दुखापत झाली. सदर घटनेच्या दिवशी पीडित पत्रकाराने पोलीस स्टेशन राजुरा येथे जीवघेणा भ्याड हल्ला चढविणाऱ्या दोषींविरुद्ध गुन्हा नोंदविला. मात्र अजूनही सदर दोषींवर कोणतीच कारवाई करण्यात आली. यामुळे पत्रकार सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. सदर दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शाखा राजुरातर्फे राजुऱ्याचे पोलीस निरिक्षकांमार्फत पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर असे हल्ले वाढत राहिल्यास भविष्यात जनतेचा आवाज उठविणाऱ्या पत्रकारांना सुरक्षा कवच राहणार नाही. यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेऊन सदर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे. तसेच केलेल्या कार्यवाही संदर्भात लेखी स्वरूपात माहिती सात दिवसाच्या देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुशील मडावी, जिल्हा उपाध्यक्ष भगीरथ वाकडे, धनंजय बोर्डे, रमेश लिंगमपल्लीवार, सदानंद मडावी, पुरुषोत्तम वाघमारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here