विठ्ठलवाड्यात युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

0
627

विठ्ठलवाड्यात युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

गोंडपिपरि(सूरज माडुरवार)

दि.१ मंगळवारी पहाटे साडे चार वाजता तालुक्यातील विठलवाडा येथील विणा दादाजी पिंपळशेंडे वय (२३) युवतीने आपल्या घरीस गळ फास घेऊन आत्महत्या केली असल्याने खळबळ उडाली आहे.
अत्यंत हुशार आणि गावात सर्वांसोबत हसत खेळत वागणारी असा तिचा स्वभाव होता.तिचे पोलिस बनण्याचे स्वप्न होते.ती तशी चंद्रपूर ला खासगी क्लासेस लावून तयारीही करत होती,पण कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागला त्यामुळे ती गावातच राहून तयारी करत होती.घरचे वातावरण सुद्धा छान होते.तिला आई वडील आणि तिचा लहान भाऊसुद्धा तिला प्रोत्साहन देत होते.आई वडील शेतकरी असल्यामुळे घरची शेती करायची आणि घरीच राहून अभ्यास करायचा हा तिचा नित्यक्रम होता. पण नियतीला ते काही मान्य नव्हते.तिचा मनामधे नेमक काय चाललं होत ते कुणालाच कळलं नाही.दिनांक 1 जून च्या पहाटे साडे चार वाजता घरचे सगळे जन झोपी असतानाच तिने टोकाचे पाऊल उचलले आणि आपल्या खोलीमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.दिवस उजाडला तरी आपली मुलगी का उठली नाही हे बघण्यासाठी तिची आई दार उघडण्यासाठी गेली असता आतून दार बंद होते.खिडकीतून डोकावून बघितले आपली मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आहे हे लक्षात आल्यानंतर आरडाओरड करायला सुरुवात केली तेव्हा ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती गोंडपीपरी पोलीस विभागाला कळविण्यात आले असता.घटनास्थळी पोलीस विभागाचे कर्मचारी हजर झाले. तिचा मृत्यदेह रुग्णवाहिकेत टाकून शवविच्छेदना करीता ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे नेण्यात आले आहे.पुढील तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय धर्मराज पटले,पुलगमकर करीत आहे. गोंडपीपरी पोलीस करीत आहेत. विना च्या अश्या अचानक केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here