कोरपन्यात काँग्रेसचा दणदणीत ‘विजय’ ; स्पष्ट बहुमत 

0
688

कोरपन्यात काँग्रेसचा दणदणीत ‘विजय’ ; स्पष्ट बहुमत 

 

 

कोरपना, प्रवीण मेश्राम
नगर पंचायतच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज दि. १९ ला जाहीर झाला. यात काँग्रेसने सर्वाधिक बारा जागा जिंकत स्पष्ट बहुमत संपादित केले. या निवडणुकीकडे अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
अतिशय चुरशीच्या या निवडणुकीत काँग्रेस १२, भाजप ४ व शेतकरी संघटनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने नगर पंचायत स्थापनेनंतर सलग दुसऱ्यांदा हा विजय प्राप्त केला आहे. ही निवडणूक काँग्रेसनी आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे यांचे नेतृत्वात लढवली होती. यात काँग्रेसने सर्व १७ जागेवर स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. तर भाजप , शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी युतीतून निवडणूक लढली.
या निवडणुकीत विजयराव बावणे यांच्या पत्नी नंदाताई बावणे यांनी सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. तर सुपुत्र नितीन बावणे यांनी प्रथमच निवडणूक लढवित बावणे घराण्यातील तिसऱ्या पिढीची राजकारणात विजयी एन्ट्री केली.

काका-पुतण्याच्या लढाईत पुतण्याचा विजय
काका-पुतण्याच्या लढतीत नितीन बावणे यांनी त्यांचे चुलत काका किशोर बावणे यांचा ८३ मतांनी पराभव केला. या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

 

अशा झाल्या लढती

(प्रभाग, विजयी उमेदवार पक्ष, मते, पराभूत उमेदवार, पक्ष, मते, फरक विजयी अंतर)

प्रभाग क्र १ नंदाताई बावणे (काँग्रेस) २३३, विजय रामदास मसे (अपक्ष ) १०६ फरक १२७ मत प्रभाग क्रमांक २ मनीषा प्रशांत लोडे (काँग्रेस ) २४५ , निता श्रीनिवास मुसळे (शेतकरी संघटना) १०४ फरक १४१, प्रभाग क्र.३ नितीन विजयराव बावणे ( काँग्रेस )१६३, किशोर राजेश्वर बावणे ( भाजप )८० , फरक ८३ मत , प्रभाग क्र.४ शेख इसमाईल रसूल (काँग्रेस ) १०९, शुभम देविदास झाडे ( भाजप ) ६८ फरक ४१ मत , प्रभाग ५ निसार शेख ( काँग्रेस ) १०८ , सुहेल आबिद अली (अपक्ष )१०३ फरक पाच मत प्रभाग क्र ६ देविका रामदास पधरे (काँग्रेस) १२६ , पूजा सुनील देरकर १२० ( भाजप ) फरक ६ मत, प्रभाग क्र ७ मनोहर चने ( काँग्रेस ) ८०, सय्यद शरिक अली मोसिन अली (शेतकरी संघटना) ६० फरक २० मत, प्रभाग क्र. ८ जोशना कवडू खोबरकर ( काँग्रेस ) १५८ , जोशना वैरागडे ( भाजप )९३ फरक ६५ मत, प्रभाग ९ शेख मोहम्मद शादुल ( काँग्रेस ) ८६ , पवन सदाशिव बुरेवार ( भाजप ) ७९ फरक सात मत , प्रभात १० लक्ष्मण पधरे ( काँग्रेस ) १३३ , सुभाष आत्राम (भाजपा) ९२ फरक ४१ प्रभाग ११ वर्षा राजू लांडगे ( भाजप ) १३१ , सोनाली सागर बूरेवार ( काँग्रेस ) १०९ फरक २२ मत , प्रभाग १३ आशा दशरथ झाडे ( शेतकरी संघटना) १६३ , मंगला मारोती पारखी ( काँग्रेस) ८५ फरक ७८ , प्रभाग १३ सविता शिवाजी तुमराम ( भाजप ) १०८ , संगीता मिंनाथ पधरे ( काँग्रेस ) ८६ फरक २२ , प्रभाग १४ राधिका कवडू मडावी (काँग्रेस ) ११७ , जयश्री विनय मेश्राम (अपक्ष ) ६८ फरक ४९ , प्रभाग 15, गीता अशोक डोहे ( भाजप ) १२७  टिना विनोद गीरडकर ( काँग्रेस ) ११० फरक ८ मत, प्रभाग १६ सुभाष हरिदास हरबडे ( भाजप ) ११० , दिलीप मानसिंग जाधव ( काँग्रेस ) ९८ फरक १२ मत , प्रभाग 17 शेख आरिफा रमजान ( काँग्रेस ) ९८ , हुसेन वहीदाबी हुसैन जकिर ( अपक्ष ) ४५ फरक ५३

बावणे कुटुंबीय नेतृत्वाची पाच दशके आणि आता तिसऱ्या पिढीकडे सत्तेची धुरा

१९६२ ला कोरपना येथे ग्रामपंचायत स्थापनेपासून बावणे कुटुंबीयांची मध्यंतरी पाच वर्ष अविरोध निवडणूक सोडता अविरत सत्ता आहे. प्रथम सरपंच चिंतामनराव बावणे १९६२ ते १९८४ पर्यंत २० वर्ष नेतृत्व केले. या दरम्यान १९७५ ते १९७७ हा दोन वर्ष आणीबाणीचा काळ होता. १९८४ मध्ये  ते आजारी असताना त्यांच्याच पुढाकारातून पाच वर्ष भाऊराव कारेकर यांना सरपंच पदाची धुरा देत अविरोध सत्ता देण्यात आली. १९८९ पासून जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे यांच्या नेतृत्वात येथील सत्ता नगर पंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणूकी नंतर ही आज ही अबाधित ३३ वर्षापासून आहे. असा एकूण पिता – पुत्र मिळून ५३ वर्षाचा सत्ता कालावधी असून हा ही एक सत्ता कार्यकीर्तीतील विक्रमच आहे. आणि याच लोकमान्य नेतृत्वात तिसरी पिढीनी ही आता लोकसेवेत विजयी परंपरेची शृंखला कायम ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here