लव्ह @५० 

0
1017

 

जयंत माई ण कर

“का आलास रे माझ्या जीवनात? तेही इतक्याउशिरा?, शृंगाराचा परमोच्च क्षण जवळ येत असताना देवयानी प्रसादला आपल्या छातीशी आवळून घेत त्याचा चेहरा आपल्या चेहऱ्याजव ळ आणून त्यावर चुंबनाचा वर्षाव करत म्हणाली.

 

प्रसादच मात्र तिच्या वाक्याकडे लक्ष नव्हतं. सुखाच्या परमोच्च क्षणाच्या प्राप्तिकडे त्याच लक्ष लागले होते. तो क्षण काही सेकंदात आला. शांत झालेला प्रसाद तिच्या चुम्बनांची तितक्याच आवेगाने परतफेड करत म्हणाला ,”मग मला भेटत जाऊ नकोस”!

“ते आता शक्य नाही”, देवयानी आपलेलं ओठ त्याच्या ओठावर टेकवत,एक पलटी घेत म्हणाली!

इतक्यात प्रसादचा उशीखाली ठेवलेला मोबाईल व्हायब्रेट होऊ लागला.

“मोबाइलला हात लावू नकोस”, देवयानी म्हणाली!

पण प्रसादने फोन घेतलाच. आपला एक हात देवयानी च्या तोंडावर ठेवत दुसऱ्या हाताने त्याने फोन घेतला,

‘बोल शर्मिष्ठा’!,-आपल्या एकुलत्या एक मुलीला तो म्हणाला.

 

“तू केव्हा घरी येतोय? आणि उद्या केमिस्ट्रीचा पेपर आहे. मला तुझ्याकडून समजून घ्यायच आहे. तू मला आठच्या आत घरी पाहिजे”, शर्मिष्ठा आपल्या dominant आवाजात म्हणाली.

 

‘मी येतो’,प्रसाद म्हणाला!

दारू पीत बसू नकोस’!

 

शर्मिष्ठा , मी येतो, अस म्हणत त्याने फोन बंद केला. बंद झाल्याची खात्री करून त्यांनी देवया नी च्या तोंडावरचा हात काढला.

तिच्या चेहऱ्यावर खोडकर हास्य होत.

 

‘मनिषा’?

 

‘छे! तिला काय पडली आहे! ती आपली बँकेत कॅश मोजत बसली असेल. नवरा जेवला काय नाही काय तिला फिकीर नाही. तिला काळजी तिच्या आई वडलांची’! ही शर्मिष्ठा! उद्या कॉलेज एक्झाम आहे. तेव्हा केमिस्ट्री चा phd असलेला बाप तिच्या सर्व difficulties सोडयायला तिला तीच्यासमोर उभा पाहिजे’!, देवयानी च्या मेंदी लावलेल्या दाट केसातून हात फिरवत तो म्हणाला.

 

‘माझी किरणही अगदी तसाच करते सर्व सोशल सायन्स एक्झामला मला उभी धरते’, सोशोलॉजीची phdअसलेली देवयानी म्हणाली.

 

चल तू जा! जायला एक तास लागेल, देवयानी प्रसादला दूर करण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

पण प्रसादनी तीच न ऐकता सरळ तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले. एका प्रदिर्घ चुंबनानंतर तो उठला आणि दोघेही अंगावर कपडे घालू लागले.

 

नवऱ्याचं ठीक सुरु आहे की त्रास आहेच?, प्रसाद देवयानी ला म्हणाला.

 

” प्रसाद, अस आहे, की तो आहे साधा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग चा डिप्लोमा होल्डर.मी phd. नाकापेक्षा मोती जड..

 

का केलस?

 

‘तू भेटला कुठे 12 वी नंतर?’ वडलांना जातीचा पाहिजे होता, त्यांनी दिला बांधून सलील…

 

मी तुझ्या वडलांना चाललो असतो?

 

चालला ?अरे धावला असतास! तू तर आमच्या हुन उच्च वर्णीय!

 

दोघेही रूमच्या दरवाज्याजवळ गेले आणि आवेगाने दोघांनीही एकमेकांना मिठीत घेतले.

प्रसादच्या छातीवर बुक्क्या मारत देवयानी पुन्हा म्हणाली.

‘का आलास रे माझ्या जीवनात, तोही इतक्या उशिरा’!

 

“उशिरा का होईना, तुझे केस पिकल्यानंतर, माझे गळल्या नंतर आपण सोशल साईट्स मुळे एकत्र आलो हेही नसे थोडके”प्रसाद म्हणाला. दोघांचाही आवेग आता ओसरला होता. प्रसादनी दरवाजा उघडला आणि कोणी ओळखीचे समोर नाहीत याची काळजी घेत दोघेही बाहेर पडले आणि आपापल्या घराच्या दिशेने निघाले.

त्या दोघांचे अफेअर सुरू होऊन सहा महिने झाले होते. दोघेही निवृत्ती कडे झुकलेले. पण शरीराने, मनाने दोघेही तरुण! देवयानी च्या शब्दात तिला प्रसादचा शब्दामुळे तारुण्य मिळाल.

 

प्रसादच्या रुक्ष वैवाहिक जीवनात त्याची मुलगी ही एकमेव oasis होती.

 

देवयानी च्या जीवनात वेगळंच वादळ होत. जातीतील उच्च शिक्षित नवरा पाहत तिला पस्तिशी आली होती. जातीची अट वडलांची तर शिक्षणाची देवयानी ची.

दोघांच्या अफेअर ची

सुरुवात जरी सहा महिने आधी झाली असली तरी दोघांच्यात आकर्षणाची बीज शालेय जीवनातच रोवलीगेली होती.तो वर्गातला सायन्सचा wizard तर ती सामाजिक , राजकीय विषयांवर आपली मते मांडणारी वादपटू! पण एकमेकात आकर्षण होत. एकमेकांशी कधीही न बोलता. एकदा अजाणतेपणी दोघांची टक्करही झाली होती. पण दोघेही एकमेकांना दोष न देता दूर झाले होते. देवयानीनीही त्या टक्करचा दोष प्रसादला दिला नव्हता. अर्थात प्रसादचाही दोष नव्हता. देवयानी ची आई बंगाली होती म्हणू न ती एवढी मधाळ असावी असा शोध तिच्याशी एक अक्षरही न बोलता प्रसादनी मनातल्या मनात लावला होता. टक्कर झाल्यानंतर दोघे एकमेकांकडे पाहू लागले होते आणि क्वचित हसूही लागले होते.पण तेवढ्या सुतावरून तीस वर्षांपूर्वी अहमदनगर सारख्या गावात स्वर्ग गाठण्याचा प्रश्नच नव्हता. पण अचानक ही सगळी नाळ तुटली. देवयानीच्या वडलांची बदली झाली म्हणून नागपूर ला गेली तर प्रसाद पुण्याला गेला. नंतर 30 वर्षे दोघांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट नव्हता. दरम्यान दोघेही आपापल्या क्षेत्रात खूप पुढे गेले. मात्र दोघांमध्ये ही एक साम्य होत.दोघांचंही लग्न पस्तिशी त झालं होतं. प्रसादची तर चक्क दोन लग्न झाली होती. त्याच्या पहिल्या पत्नी च्या छाती, मांड्यावर कोड होते. लग्नानंतर पहिल्या रात्रीच आपल्या पत्नीच्या शरीराची ही विदारक ता त्याला दिसलंI. ऑन द स्पॉट त्यांनी तिच्या अंगाला हातही न लावता तिच्या वडलांना फोन केला. वडील येईपर्यंत बायकोने आत्महत्या करू नये म्हणून तो स्वतः तिच्याशी एक शब्दही न बोलता बसून राहिला. तिच्या वडिलांनी आल्या आल्या पाय पडत आपली चूक असल्याचं मान्य केलं आणि मुलीला स्वीकारण्याची गळ घातली. निग्रही प्रसादनी ती अमान्य केली. शेवटी दोघांच्याही संमतीने काहीही पोटगी न देता प्रसादनी divorce मिळवला. पण प्रसादच्या नशिबी विवाह सौख्य नव्हतेच. पहिल्या अनुभवामुळे सावळ्या वर्णाच्या केवळ पदवीधर असलेल्या मानिशाशी त्यानी लग्न उरकून घेतलं. स्वतःच्या ओळखीने तिला एका सहकारी बँकेत लावून दिले. त्याला एक मुलगीही झाली. पण नंतर मनीषा सतत आजारी राहू लागली. त्यामुळे सेक्स लाईफ चा प्रश्नच नव्हता. त्याला बायको मिळाली तर दोन तीन महिन्यातुन एकदा औषधापुरती मिळायची. दुसऱ्यांदा divorce घेण्याचा प्रश्नच नव्हता. प्रसाद मनातल्या मनात कुढत होता. पण त्याची मुलगी शर्मिष्ठा त्याच्या पावलावर पाऊल टाकून सायन्स मध्ये पुढे जात होती.

इकडे देवयानी नी पडतं घेतलं आणि शिक्षणाची अट बाजूला ठेवलीआणि अखेर तिला सलील मिळाला. पण मनात सतत inferiority complex असल्यामुळे सलील देवयानी शी कधीही एकरूप होऊ शकला नाही. त्यांच्यातील दरी कायमच राहिली. देवयानी चा स्वभाव प्रसाद ची बायको मनीषा सारखा पहिल्याच भेटीत भडाभडा ओकल्यासारखं बोलणारा नसला तरी तिच्या बोलण्यातून बऱ्याच hints मिळत. सोशल साईट्स च्या चॅट मध्ये आणि एकमेकांच्या घरी झालेल्या भेटीत तीने शिताफीने सलीलच्या शिक्षणाचा विषय टाळला होता. अर्थात तीच हे टाळण प्रसादच्या नजरेतून सुटलं नव्हतं. सलीलच्या शिक्षणाची वास्तविकता आणि त्यामुळे त्याच्या वागणुकीत डोकावणारी हिंसक वृत्ती याच विदारक वर्णन, देवयानी नी पहिल्यांदा सांगितले तेव्हा ती त्याच्या मिठीत होती.

‘मला हे अपेक्षित च होत ‘, प्रसाद तिला म्हणाला आणि तिच्या स्तनांवर आपली छाती दाबत त्यानी प्रश्न केला, how is he sexualy?

देवयानी च्या चेहऱ्यावर त्याही अवस्थेत एक वेदना दिसली. तो माझ्या मुलीचा बाप आहे’, बस्स!

‘माझीही अवस्था काही याहून वेगळी नाही’, प्रसाद देवयानी ला घट्ट मिठीत घेत म्हणाला. ती मिठी इतकी घट्ट होती देवयानीचा श्वास रोकला गेला होता. प्रसादचा आवेग ओसरल्यानंतर तिनेच त्याला सांगितले होते. त्यानंतर मात्र प्रसादनी आपला आवेग आवरता ठेवला होता.

 

म्हणजे रूप, बुद्धिमत्ता, पैसे असूनही आपण दोघेही sexualy satisfied नाहीत. आणि म्हणून च कदाचित त्या नियतीने सोशल साईट्स द्वारे आपल्याला एकत्र आणलं असावं. देवयानी नी त्याच चुंबन घेत त्याच्या वाक्यावर शिक्कामोर्तब केले.

त्यांच्यातले विवाहबाह्य संबंध सुद्धा सोशल साईट्स च्या माध्यामातून एकत्र आल्यानंतर सुमारे एक वर्षांनी सुरू झाले. तेही तिच्या पुढाकाराने.

 

‘कशी आहे– तुझी मनीषा—‘, हॉटेलमध्ये कॉफ़ी घेत असताना ती काहीशा खोचकतेने म्हणाली. पण तिची नजर मात्र प्रसादच्या चेहऱ्यावर खिळलेली होती.

 

तिच्या खोचकतेकडे दुर्लक्ष करीत प्रसाद म्हणाला, ‘किरण कशी आहे’?

 

‘तुझी आठवण काढते. आई तुझा मित्र सिनेटवर निवडून आले आहे म्हणत होती, ‘ खोडकर हसत देवयानी म्हणाली.

 

‘मग तू काय म्हणालीस’,प्रसाद म्हणाला..

 

‘ते जाऊ दे, मनीषा, शर्मिष्ठा कसे आहेत’,देवयानी म्हणाली.

 

‘देवयानी, तू उत्तर काय दिलस’, अडेलतट्टू पत्रकारप्रमाणे प्रसाद म्हणाला.

 

देवयानी ची मान खाली होती. पण तिच्या गालावर ओघळलेले प्रसादनी तिचे अश्रू पुसण्यासाठी हात समोर केले , पण तिला स्पर्श कसा करायचा हा मनात विचार करून मागे घेतले. पण तितक्यात देवयनीनीच आवेगाने त्याचे हात धरले आणि त्याच्या हातावर चेहरा ठेवून ती स्फुंदु लागली.

 

प्रसाद नी संधी सोडली नाही. त्यानी तिला थोपटून शांत केलं आणि बिल देऊन तिला घेऊन सरळ टॅक्सी त बसला.

 

जोगेश्वरी चलो!

 

देवयानी नी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण प्रसादनी खुणेनेच तिला चूप बसायला सांगितले.

 

टॅक्सी च्या प्रवासात दोघेही एकमेकांशी काहीच बोलले नाही.

 

प्रसादनी टॅक्सी आडवळणावर एका जुनाट इमारतीसमोर थांबवली. देवयानी नी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहिले.

 

‘चल उतर’!, अस म्हणत प्रसादनी टॅक्सी चे भाडे दिले. जुनाट इमारतीतील छोट्याशा जिन्याने दोघे दुसऱ्या मजल्यावर गेले. त्यातील एका फ्लॅट च्या बंद दारावर पाटी होती प्रा. प्रसाद देशपांडे…

 

ओहो! हे तुझं दुसरं घर! देवयानी म्हणाली.

 

“आतापर्यंत भाडेकरू होता. सोडून गेला. तुझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारायला हॉटेलहून चांगली जागा आहे”

 

देवयानी चा चेहरा चांगलाच दुखावलेले दिसला. वन रूम किचन च्या छोटेखानी घरात एक प्रशस्त बेड होता.

 

‘तू बस !मी खालून पाणी, आणि खायचं आणतो”, अस म्हणत प्रसादनी तिला फॅन, एसी ऑन करून दिला. खालून येताना पाण्याच्या बाटल्या,बिस्किटे आणताना तो कंडोम घ्याल विसरला नाही. लैच उघडून तो आत आला तोपर्यंत देवयनी त्याच्या बेडवर चक्क झोपली होती.

 

तो तिच्या जवळ बसत म्हणाला , ‘देवयानी उठ’! पण ती उठली नाही. प्रसादनी तिच्या स्लीवलेस घातलेल्या दंडाला धरून हलवले. ती एकदम उठून बसली.

‘मला एकदम झोप लागली रे प्रसाद’!

 

‘देवयानी , तू मघाशी का रडलीस’?

 

देवयानी चा चेहरा पुन्हा एकदा विदीर्ण झाला. प्रसादच्या खांद्यावर डोकं टेकवून ती रडू लागली.

 

“सलीलला तुझं नाव घरात घेतलेलं आवडत नाही. त्याला उगाच अस वाटत की तू मला आवडतोस”

 

देवयानी, मी तुला आवडत नाही?

 

” मी तसा कुठे म्हणली”,प्रसादच्या खांद्यावर ठेवलेली मान न हलवत खालच्या नजरेने देवयानी म्हणाली.

 

प्रसादनी या संधीचा फायदा घेतला. तिचा चेहरा ओंजळीत धरून आपल्या चेहऱ्याजवळ आणत तो म्हणाला, ‘तू का रडलीस’?

 

प्रसाद , आपण दोघेही समव्यावसायिक! सलिल ला अस वाटत की मी तुझ्यावर फिदा आहे.

 

नाहीस का?

 

देवयानीनी त्याला हळूच चापट मारली.

 

‘रडलीस का?’

 

प्रसाद, sometimes he is violent, आणि ती रडू लागली.

 

Sometimes or always?

 

देवयानी नी काहीच उत्तर दिलं नाही.

त्या दिवशी तसच झालं. किरणनी तुुझा उल्लेख माझा मित्र म्हणून केला याचा त्याला राग आला. आणि त्यांनी तो राग माझ्यावर अगदी दूध उतू गेल्याच्या क्षुल्लक कारणावरून काढला. एक थोबाडीत मारून! किरण च्या देखत!

 

हुंदके देणाऱ्या देवयानी ला प्रसादनी मिठीत घेतले. तिचे स्तन त्याच्या छातीवर दाबले जात होते.

प्रसादचा हात तिच्या पाठीवरून कमरेपर्यंत सरकला होता. पन्नाशीकडे असली आणि एक मुलीची आई असली तरीही तिचा फॉर्म फिगर चांगली होती.

 

सोशल साईट्स द्वारे झालेल्या ओळखीनंतरच्या पहिल्या च भेटीत प्रसादच्या डोक्यावरील अर्धचंद्रा कडे पाहत देवयानी म्हणाली लवकर म्हातारा व्हायला लागला का?

 

छे ग! टक्कल हे तर बुद्धिमत्तेच लक्षण आहे,हसत प्रसाद म्हणाला. बाजूला तिचा नवरा सलील बसला होता.

 

मी मात्र फॉर्म, फिगर टिकवून आहे.

 

प्रसादनी तीच वाक्य हसण्यावारी नेलं, पण त्याच्या मनात मात्र घर करून बसली होती.

 

तशी ती कॉलेज जीवनापासून त्याच्या मनात ठसली होती पण तेव्हा त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या नव्हत्या आणि आता पन्नाशीत पोचल्यानंतर व्यक्त करून फायदा नव्हता. पण स्वतः च्या फिगरविषयी तिनी म्हटलेलं वाक्य त्याच्या लक्षात राहिलं.

 

आज त्याचा हात तिच्या फिगर वरून फिरत होता.आणि तिची त्याला संमती होती.

 

त्याचा एक हात तिच्या कमरेभोवती आणि एक हात पाठीवर होता. देवयानी त्याच्या बाहुपाशात बद्ध होती.

देवयानी चेही हात त्याच्या पाठीवरून फिरत होते. प्रसादनी तिला बेडवर झोपवले आणि तो तिच्या वर विसावला. त्याचा हात आता सरळ तिच्या स्तनांवरुून फिरत होता.

‘ प्रसाद , प्लिज नको, थांब!’

 

प्रसादनी हात थांबवला आणि म्हणाला, ‘तुला खरच नको’…?

 

देवयानी नी मान वळवली. तिच्या चेहऱ्यावर लज्जा मिश्रित हास्य होत.

 

प्रसादनी संधीचा फायदा घेत तिच्या ओठावर ओठ टेकवले. देवयानी चा प्रतिसाद होताच. आणि त्यांचे संबंध सुरू झाले. आपापल्या जोडीदाराकडून न मिळालेलं शारीरिक सुख ते एकमेकांकडून घेऊ लागले.

संबंधांच्या सुरुवातीपासूनच प्रसादनी काळजी घेतली होती. कंडोम वापरून.देवयनी आपल्यावर बलात्काराचा आरोप करेल अशी त्याला पुसटशी ही शंका नव्हती. पण तो काळजी घेत होता.

पाच मिनिटांच्या सुखाकरता 35 वर्षाच्या करिअर चा प्रश्न होता.

“देवयानी, तुला काय किंवा मला आपला डॅमेज झालेला असला तरीही संसार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण संसाराची काळजी घेऊनच आपले संबंध सांभाळायचे आहेत. मी धर्मेंद्र नाही की जो दुहेरी संसार सांभाळेल किंवा आपल्याला एक मुलगा, मुलगी पण नाही की ज्यांचं लग्न करून देऊन आपण हम आपके है कौन मधल्या अनुपम खेर, रीमा लागू प्रमाणे नाचू.”, प्रसाद म्हणाला. आपण क्रिमिनल ही नाही की आपापल्या पार्टनर्सचा खून करून…..

देवयानी नी त्याच्या तोंडावर हात ठेवला.

 

‘तू अनुपम खेर दिसतोस’, प्रसाद च्या तुळतुळीत टकलावर हात फिरवून त्याच चुंबन घेत देवयानी म्हणाली.

 

“म्हणजे तू रीमा लागू’!

 

‘छे! मी तिच्याइतकी जाड थोडीच आहे? मी अगदी slim trim आहे, या वयातही! आपल्या बॅच ची फिगर टिकवलेली मी एकच आहे’!

 

बघू दे तुझी फिगर,अस म्हणत प्रसाद नी तिला आपल्या बाहुपाशात घेतलं.

 

प्रसाद, आताच एक राउंड झालाआहे ना, पुन्हा कुठून जोर आणलास,काय Viagra घेतोस की काय?

 

‘तिशी, चाळीशीत, न मिळालेलं सुख जर व्या भि चारच्या रूपाने वाट्याला येत असेल तर ते भोगण्यासाठी मी Viagra का घेऊ नये?

 

‘व्या भि चार?

 

‘होय! आपल्या संबंधांना समाज व्या भि चारच म्हणेल. भलेही हा व्याभिचार आपल्या दोघांच्या संमतीने आपली शारीरिक, आणि मानसिक गरज म्हणून होत आहे.

 

म्हणजे मी व्या भि चारी?, काहीशा दुखावल्या स्वरात देवयानी म्हणाली.

 

माझी प्रेयसी!,अस म्हणत,प्रसादनी आपल्या ओठांनी तिचे ओठ बंद केले.

 

पन्नाशी पार करताना मिळालेल सुख हे दोघेही दर दिवसाआड तिशीतल्या तरुणाप्रमाणे भोगत होते. कधी कधी अगदी रोज ही भेटायचे . त्याने तिला बियरचे घुटके घेण्याची आणि menthol classic सिगारेट ओढायला शिकवलं होत.

देवयानी, आपले संबंध आपल्या बरोबरच संपले पाहिजेत. माझ्या जीवनात आलेल्या स्त्रीया, पुरुष याच रसभरीत वर्णन करायला आपण काय फिल्म स्टार नाहीत. आणि चुकून तुझ्या नवऱ्याला, माझ्या बायको ला संशय आला तरीही आपण कधीही कबुली द्यायची नाही , वेळ पडली तर आपण संबंध तोडायचे, संसार महत्त्वाचा,प्रसाद म्हणाला.

 

प्रसाद, खरच तुला सोडवत नाही, पण खूप भीती वाटते रे! सापडण्याची!

 

हे बोलत असताना तिच्या डोळ्यात पाणी आलं!

 

प्रसाद आवेगाने पुढे आला . आपल्या ओठा नी तिचे अश्रू टिपत तो म्हणाला,

तुझ्या गालावर ओघळणारे मी माझ्या ओठांनी टिपीन.

आणि हृदयात जतन करीन

पण प्रश्न आहे तो वेगळाच

माझ्या गालावरचे अश्रू तुझे ओठ टिपतील का?

 

प्रसादच्या गाला च चुंबन घेत देवयानी म्हणाली, मी टीपते, पण तू कधी रडतच नाहीस. आणि ही कुठली कविता?

 

देवयानी, माझे अश्रू आटलेत. खूप दुःख सहन केली. एकटा रडलो.रडायला कोणाचाही खांदा नव्हता. अशाच विमनस्क अवस्थेत असताना लिहिलेल्या या चार ओळी.

 

केमिस्ट्री प्रोफेसर आणि इतकी तरल कविता, देवयनी त्याला appreciate करत म्हणाली. प्रसाद तुला माझी आई आठवते?

Oh yes! That Bengali beauty-कोमलिका गुप्ते. तिच्याच मुळे तू इतकी मधाळ झाली असे मला तेव्हाही वाटायचं आणि आजही माझं तेच मत आहे.

 

प्रसाद,आई ऐन पन्नाशीत गेली. कॅन्सर! त्यांच्या घराण्यातच आहे. Genetics!

प्रसाद आज मी पन्नाशीत आहे. आणि मी psychologically सतत आपल्याला कॅन्सर होईल या भीतीतच जगते.

प्रसाद , u know, माझी आई बंगाली CKP. लव्ह मॅरेज असूनही त्यांचं आपसात पटलं नाही. आईच्या मृत्यूनंतर वडलांनी मराठी CKP शीच आग्रह धरला आणि माझ्यासारख्या phd ला हा डिप्लोमा होल्डर दिला. पण त्याच आणि माझी पटत नाही.

 

“माझं कुठे मानिशाशी पटत? शर्मिष्ठा कडे पाहून मी आवंढे गिळत स्वस्थ राहतो.आमचं सेक्स लाईफ म्हणजे आनंदच आहे. महिन्यातून एखादं वेळेला कृपा केल्यागत. त्यामुळेच जास्त दारू प्यायला लागलो. झोप येण्यासाठी. गेले वर्षभर जर बर सुरू आहे”, प्रसाद देवयानी कडे बघत खोडकर हसत म्हणाला. देवयानी नी त्याच्या दोन्ही गालांना चिमटा काढून चेहरा आपल्या कडे ओढत त्याच्या ओठांच दिर्घ चुंबन घेतलं.

 

प्रसाद, तस नाही रे! आईला एकदम लास्ट स्टेजला असताना कँसर च निदान झालं. चार महिन्यात ती गेली. माझं काही अस झालं तर? मला किरणची काळजी वाटते रे! तिला नेमका केमिस्ट्री मध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळे तुझी भाषणं, लेख वाचत असते.”

 

“अग genetics रिपीट होईलच अस नाही. माझ्या बायको ची मावशी- आमच्या लग्नाच्या आधी कॅन्सर झाला. आजही जीवन्त आहे”,प्रसाद तीला दिलासा देत म्हणाला.

 

प्रसाद genetically काही रोग असतात.मानसिक रित्या खचल्या सारख्या वाटणाऱ्या देवयानी ला प्रसादनी आपल्या मिठीत घेतलं.

 

अचानक काही तरी आठवल्यासारखं देवयानी म्हणाली, शर्मिष्ठा हे नाव बंगाली.तू कसं ठेवलस?

 

देवयानी च्या डाय केलेल्या दाट केसातून हात फिरवत

तो म्हणाला,तू मला कॉलेजमध्ये च आवडली होती. पण प्रेम व्यक्त करण्याचा आधीच आपली ताटातुट. मला तुझं नाव फार आवडायचं. ययाती च्या पहिल्या पत्नीचं नाव देवयानी तर दुसरीच शर्मिष्ठा! पुढे माझ्या लग्नाचे असे धिंदवडे निघाल्यानंतर अगदी माझ्यासारखी दिसणारी मुलगी झाली ही महाभारत कालीन गोष्ट आठवली . आणि मुलीचं नाव शर्मिष्ठा ठेवलं”.

 

“बर झालं देवयानी नाही ठेवलस”,प्रसादच गाल आपल्या गाालावर घासत ती म्हणाली. आतापर्यंत सिरीयस मूड मधली देवयानी आता नॉर्मल झाली होती.

प्रसाद-देवयानी चे विवाह बाह्य संबंध सुरू होऊन आता जवळपास दोन वर्षे होत आली होती. त्यांचा मिटिंग पॉईंट प्रसादाच्या दुसऱ्या घरी असायचा.दोघांच्याही घरी याचा पत्ताही लागला नव्हता. सर्व गोष्टी निर्वेधपणे सुरू होत्या.

 

पण एक दिवशी तो प्रसंग आलाच. नेहमी प्रमाणे देवयानी आली.तिचा चेहरा थकलेला जाणवत होता. प्रसाद तयार होताच. शृंगार रसात असतानाच देवयनीचे हात ढिले पडले. तिचा चेहरा वाकडा झाला. घाबरून प्रसादनी तिला आपल्या पासून दूर केलं. तोंडातून फेस ही बाहेर आला होता. प्रसादनी तिच्या तोंडावर पाण्याचा हबका मारला. देवयानी नी डोळे उघडले.

“काय झालं देवयानी?”

देवयानी ची थरथर अजूनही कमी होत नव्हती. ती वॉश रूम मध्ये जाऊन आली. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर ती म्हणाली, प्रसाद , मी जाते!

 

“मी तुझ्याबरोबर येतो.काळजी करू नकोस, मी तुझ्या घराच्या पासून दूर उतरतो.” But I will not leave u alone”.

 

जोगेश्वरी ते दादर या टॅक्सी प्रवासात देवयानी त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती. प्रसाद तिला थोपटत होता.

 

अचानक ती म्हणाली. प्रसाद मला भीती वाटतेय, कँसर तर नसेल?

 

काहीतरीच काय?, प्रसाद म्हणाला आजच सगळ्या टेस्ट करून घे! मी येऊ?

 

नको! तुला कारण माहीतच आहे.

 

टेस्ट चा रिझल्ट कळवं! देवयनीच्या घराच्या एक चौक आधि च प्रसाद उतरला. टॅक्सी देवयानी ला घेऊन समोर गेली.प्रसाद दुसरी टॅक्सी घेऊन तिच्या मागे गेला. दरम्यान देवयनीनी किरणला फोन करून बिल्डिंग च्या खाली उभं राहायल सांगितलं होतं.

प्रसादनी आपली टॅक्सी थांबवली. किरण खाली आली होती.देवयानी तिच्या आधाराने बिल्डिंगमध्ये गेल्याचं त्यानी पाहिलं आणि टॅक्सी जवळच्याच एक बार कडे वळवली. कुठल्याही प्रकारचा पुरावा राहू नये म्हणून दोघेही एकमेकांशी फार कमी संपर्क ठेवायचे. क्वचित एकमेकांच्या कॉलेजमध्ये फोन करायचे. पन्नाशीत आपण तरुणांना लाजवेल इतकं लपवुन एकमेकांना भेटतो, प्रसाद गमतीने तिला म्हणाला होता. पण आज त्याला काळजी होती देवयानी च्या तब्येतीची.

 

बियर चा अख्खा जार त्यांनी संपवला होता. वारंवार तो फोनचे मेसेज पाहत होता. पण देवयानी चा काहीच प्रतिसाद नव्हता. अखेर प्रसाद बार च्या बाहेर पडला. टॅक्सी ने आपल्या घरी पोचला. पोटात बियर असूनही देवयानी च्या काळजीने त्याला बराच उशिरापर्यंत झोप लागली नाही. चक्कर आली हे घरात कोणालाही न सांगता सरळ टेस्ट कर, अस त्यानी तिला सांगितले होते.

दोनतीन दिवस गेले. देवयानी चा काहीच प्रतिसाद नव्हता. प्रसादनी तिच्या कॉलेजमध्ये ही फोन केला तेव्हा ती सुट्टीवर असल्याचं कळलं. प्रसादची अवस्था पाण्याविना तळ मळणार्या माशासरखी झाली होती. देवयानी च्या घराच्या आसपास ही तो चक्कर मारून आला होता.

 

अचानक तो कॉलेजच्या स्टाफ रूम मध्ये असताना त्या चा फोन वाजला.

त्यानी हॅलो म्हणताक्षणीच पलीकडून आवाज आला ,

प्रसाद, its finished! I have brain cancer!

 

काय? प्रसाद इतक्या जोरात ओरडला की बाजूचे प्राध्यापक त्याच्याकडे पाहायला लागले.

 

सगळं संपलं आहे. मी सहा महिन्यांची सोबती आहे.

काय सांगतेस तू? आपल्या प्रेयसीला झालेल्या गंभीर आजाराने प्रसादला धक्का बसला होता.

 

देवयानी- देवी , मी तुला भेटायला येतो….

 

‘मी तुला निरोप पाठवते. मी सांगीन त्याच वेळी भेटायला ये. सलील आला आहे, ‘अस म्हणत तिनी फोन कट केला.

 

प्रसाद सैरभैर झाला होता. दोन वर्षातले काही दिवस का होईना दोघांनी मानसिक आणि शारीरिक आनंद मिळविण्यात एकत्र घालवले होते.

काही दिवसात त्याला किरणचा फोन आला.” काका, मी किरण बोलत्ये. मी देवयानी ची मुलगी!

 

‘किरण , मी तुला ओळखतो. मी आईला भेटायला केव्हा येऊ?

 

‘आईनी उद्या तुम्हाला , एक ते दोनच्या दरम्यान बोलवले आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये!’

 

मी पोचतो!

 

दुसऱ्या दिवशी प्रसाद एकच्या आधीच देवयानी ला भेटायला पोचला.

 

रूम मध्ये ती एकटीच झोपून होती. प्रसाद ला पाहताच तिने उठण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी केस काढलेलं डोकं दिसलं. दाट केस लाईट्स, ऑपेशन करता काढले होते. प्रसाद, तिच्याजवळ बसला. तिला त्याने बसण्यास मदत केली.

त्याच्या गळ्यात हात टाकुन देवयानी रडत म्हणाली , प्रसाद मी चालली रे!

 

त्यानी तिच्या केस काढलेल्या डोक्याचा किस घेतला.

प्रसाद मी तुला टकल्या म्हणायची, आज मी टकली झाली.

 

तू एकटीच आहेस!

 

कोणी येणार नाही!म्हणून तर मी तुला बोलावलं!

दोघांच्याही डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि दोघेही एकमेकांच्या गालावर चे अश्रू आपल्या ओठांनी टिपत होते.

 

“It’s finished, प्रसाद! जणू मी काही पाप केलं आणि त्याची सजा मला मिळाली,” देवयानी म्हणाली. आपले संबंध जणु काही पाप ठरलें.

 

‘जे घडलं ते पाप नाही. कारण मी पाप पुण्य मानत च नाही. आणि आपल्यातल्या संबंधांना आपण दोघेही सारखे जबाबदार आहोत. मी बोलून दाखवले नाही. पण मला तू अावडायचीस अगदी कॉलेज पासून. आपण पुन्हा भेटलो तेव्हाही माझ्या त्याच भावना होत्या.पण मी त्या व्यक्त केल्या असत्या आणि तुझा रिस्पॉन्स निगेटिव्ह असता,तर तू माझी बदनामी पण करू शकली असतीस. त्यामुळे तुझा पुढाकार हा महत्त्वाचा होता. Illicit relationship can’t start or sustain without the nod approval of a woman. But I am not blaming you. I am giving facts. आपल्यातले संबंध कोणालाही कळणार नाहीत”, प्रसाद म्हणाला.

 

“ती खात्री आहे. किरण कडे लक्ष दे. तिला नेमका केमिस्ट्री आवडतो. सलील तिला नीट गाईड करू शकत नाही. मी तिला सांगितले आहे,”देवयानी निरवानिरव करत म्हणाली.

 

“देवयानी, शर्मिष्ठा ला सोशोलॉजी आवडत! आता तू नसशिल तिला मी कुठून गाईड आणू?” पण मी किरण कडे लक्ष देईन!”,प्रसाद म्हणाला.

 

“प्रसाद , का आलास रे माझ्या जीवनात? तोही इतक्या उशिरा!”, देवयानी नी तीच परवलीच वाक्य म्हटलं जे ती प्रत्येक भेटीत म्हणायची.

 

प्रसाद तिला जवळ घेऊन थोपटत राहिला.

 

प्रसाद, तू आता जा! माझ्याविषयी ची बातमी तुला किरण देत जाईल. तू तिच्याशीच बोल. माझ्यात ताकद असली तर मी फोन करीन. सलील यायची वेळ झाली आहे”, देवयानी म्हणाली.

 

प्रसाद उठला! दोघांनीही एकमेकां कडे करुण नजरेने पाहिलं. दोघांच्या ही डोळ्यात आसव होती .

हृदयावर दगड ठेवून प्रसाद रूमच्या बाहेर पडला.

पण तो देवयानीच्या एका वाक्यानी सुखावला होता.

“प्रसाद, तुझ्या मिठीत काढलेली दोन वर्षे , माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते.”, तो दरवाजाबाहेर पडत असताना देवयानी म्हणाली होती.

अस्वस्थ मनस्थिती त रस्ता ओलांडून तो पलीकडे गेला. देवयानी ची आठवण उचंबळून आल्याने त्याने मागे वळून पहिलं. तेव्हा त्याला पाठमोरा सलील दिसला.

जर प्रसाद पाच मिनिटे देवयानी सोबत थांबला असता तर दोन वर्षांच्या संबंधात तो पहिल्यांदा तिच्याबरोबर एकटा सापडला असता. देवयानी च्या शार्प टायमिंग मूळे आज दोघेही वाचले होते.

देवयानीची केमेओथेरेपी ची ट्रीटमेंट सुरू होती. कधी कधी किरण चा निरोप यायचा. तिनी सांगितल्या वेळात तो तिला भेटूनही यायचा. पण प्रसाद सैरभैर झालेला होता. दारूचं प्रमाण वाढलं होतं. अर्थात त्याच कार ण जाणून घेण्याची त्याच्या पत्नीला मानिशाला गरज नव्हती. ती फोनवर रोज एक वेळ आपल्या माहेरच्यांशी गप्पा मारण्यात गर्क असायची. शर्मिष्ठा ला मात्र तिच्या डॅडी मधला फरक लक्षात आलं होता. तिनी विचारायचा प्रयत्नही केला. पण प्रसादनी उत्तर टाळलं.

 

दरम्यान झालेल्या एक भेटीत तब्येत खालावत असल्याचं त्याला किरण बोलली. त्याला स्वतः ला पन्नाशीत फॉर्म टिकवून असलेली पण आता अस्थीपंजर झालेली देवयानी दिसत होती. तिच्या प्रत्येक भेटीनंतर तो बारमध्ये बियरचे मग रिचवीत मनातल्या मनात रडण्याच्या पलीकडे तो काहीच करू शकत नव्हता.

एक दिवशी मध्यरात्री अचानक त्याचा फोन वाजला. मध्यंतरी देवयानी ला डिस्चार्ज ही केलं होतं. त्यामुळे त्यांच्या भेटी पण कमी झाल्या होत्या.

 

“काका , मी किरण बोलत्ये! आई बेशुद्ध पडली, म्हणून तिला ऍडमिट करायला नेलं आहे. She is serious.”,किरण रडत म्हणली.

 

Oh my god! मी येतोच!, प्रसाद म्हणाला.

 

पण प्रसाद पोचेपर्यंत सर्व संपलं होत. देवयानी ची बॉडी घरी नेण्यात आली होती. तो देवयानी च्या घरी पोचला. रडणाऱ्या किरणच आणि काहीच फरक न पडलेल्या सलिल च त्यानी सांत्वन केलं.

स्मशानभूमीत झालेल्या शोकसभेत देवयानी चा सर्वात जुना सहकारी म्हणून तो बोलायला उभा राहिला आणि त्याचा बांध फुटला.

 

“मी१६ वर्षाचा असताना देवयानी माझ्या कॉलेज मध्ये होती. आम्ही दोघेही वेगळ्या विषयाचे. ती सामाजिक विषयावर भरभरून बोलणारी, मी लॅब मध्ये रमणारा. दोघेही प्राध्यापक झालो आणि मुंबईत सोशल साईट्स मुळे भेटलो. Human being is just nothing but the chemical reaction. देवयानी नावाची chemical reaction आता संपली आहे. आता.. उरल्या .आहेत…. तिच्या ..आठवणी….!”

एवढच तो बोलू शकला. त्याच्या डोळ्यासमोर काढलेली दोन वर्षे, शृंगार नाचत होता. देवयानी ला मात्र आगीच्या ज्वालानी लपेटल होत.

 

किरण ,सलिल च सांत्वन करून तो बाहेर पडला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. त्यानी टॅक्सी दादर चौपाटी वळवली. चौपाटीवर बसून समुद्राकडे बघत त्याचा बांध फुटला…

तो मनाशीच म्हणाला,

“देवयानी, किती उशिरा आलीस ग माझ्या जीवनात आणि किती लवकर गेलीस”….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here