जिल्ह्यात पहिल्याच दिवशी १५२०९ मुलं-मुली यांनी घेतली कोरोना लस

0
521

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी १५२०९ मुलं-मुली यांनी घेतली कोरोना लस

अहमदनगर
संगमनेर
प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील
राज्य सरकारने आज पासून शालेय विद्यार्थी यांच्या लसीकरण बाबत मोठे पाऊल उचलले असून, संभाव्य तिसरी लाट रोखण्या करिता मुलांचे लसीकरण वेगवान होत असून, विद्यार्थी ही मोठा प्रतिसाद देत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील मुलांचे सोमवारपासून (दि.3) करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. जिल्ह्यात 2 लाख ३८ हजार मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असून पहिल्याच दिवशी १५हजार २०९ मुलांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. पहिल्या दिवशी लस घेणार्‍या मुलांमध्ये नगर जिल्हा राज्यात तिसर्‍या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर ठाणे असून त्या ठिकाणी १७हजार ९९९ तर दुसर्‍या स्थानावर पुणे असून त्याठिकाणी १६ हजार ५१५ तर नगर जिल्हा हा तिसर्‍या स्थानावर आहे.

राष्ट्रीय स्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात करोना प्रतिबंधक लसीकरणास १६ जानेवारी २०२१पासून सुरुवात झाली होती. जिल्ह्यात आत्तापर्यंत उद्दिष्टापैकी २८ लाख ७६हजार ६६८ लोकांनी (७५टक्के) तर १७ लाख २७हजार २२५(४५ टक्के) लोकांनी लशीचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत. आता ओमायक्रोन व्हेरिएंटमुळे राष्ट्रीय स्तरावरून २५ते १८वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर, ६० वर्षांवरील व सहव्याधी असणार्‍यांना तिसरा डोस (प्रिकॉशन डोस) देण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे कालपासून लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात१५ ते १८ वयोगटातील लाभार्थी सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेला २ लाख ३८ हजार लसीकरणाचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी पहिल्या दिवशी १५ हजार २०९ मुलांना करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने आमच्या प्रतिनिधी कडे बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here