महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा अध्यक्ष गडचिरोली यांच्या प्रयत्नाला अखेर मिळाले यश

0
576

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा अध्यक्ष गडचिरोली यांच्या प्रयत्नाला अखेर मिळाले यश

 

गडचिरोली, सुखसागर झाडे
रामदास वासेकर यांना समायोजनाने स्वंयपाकी पदावर मनोहरभाई पटेल शिक्षण संस्था गोंदिया द्वारा संचालित अनुदानित आश्रम शाळा भागी, प्रकल्प -देवरी येथे तात्काळ रूजू करून घेण्यात आले. त्या संस्थेचे व शाळेचे अभिनंदन करण्यात आले.

रामदास वासेकर हे अनुदानित आश्रम शाळा कवठाळा, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथे स्वयंपाकी पदावर कार्यरत होते.सदर शाळेची मान्यता ३ डिसेंबर २०१८ मध्ये रद्द झाल्यामुळे अतिरिक्त ठरले होते. मागील तीन वर्षापासून ते वेतनापासून वंचित होते. त्यांच्या समायोजना साठी संतोष सुरावार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोली यांनी मागील तीन महिन्यापासून सतत अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर विभाग यांच्याकडे सतत पाठपुरावा केले.एवढेच नाही तर वारंवार स्वतः रामदास वासेकर यांना सोबत घेऊन अपर आयुक्त कार्यालयात निवेदने दिली.

नागो गाणार सर आमदार नागपूर विभाग नागपूर यांनी सुद्धा वेळोवेळी संबंधित कार्यालयाला पत्र दिले. तेवढ्याच कर्तव्य निष्ठेने रवींद्र ठाकरे साहेब अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर, दशरथ कुळमेथे साहेब उपआयुक्त आणि त्यांचे कर्तव्यनिष्ठ सहकारी कर्मचारी निलेश राठोड , सुनील मिसार, तातोडे सर या सर्वांनी अगदी कमी कालावधीत उत्कृष्ट सहकार्य करून सदर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला. समायोजना साठी वेळोवेळी येणारे अडथळे दूर करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळेच समायोजनाची प्रक्रिया यशस्वी झाली . रामदास वासेकर यांचे समायोजन झाले. या सर्व अधिकारी आणि सहकारी कर्मचारी बांधव यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोली तर्फे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानण्याल्या जात आहे.

संतोष सुरावार सर आणि नागो गाणार सर आमदार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी वासेकर यांचा पाठपुरावा केल्यामुळेच इतरही १३ कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. आणि त्यांचे सुद्धा समायोजन झाले.

परंतु काही संघटनांचे कार्यकर्ते या समायोजन झालेल्या प्रक्रियेचा स्वतः श्रेय घेऊ इच्छित आहेत. आणि समायोजित झालेल्या कर्मचाऱ्यांकडून फोन द्वारे संपर्क करून पैशाची मागणी करत असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला माहिती प्राप्त झाली आहे.

करिता समायोजित झालेल्या कर्मचाऱ्यांनी कोणालाही पैसे देऊ नये. जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोली यांना संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here