क्रीडाक्षेत्रातून व्यक्तिमत्व विकास होतो – माजी जिप अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन

0
488

क्रीडाक्षेत्रातून व्यक्तिमत्व विकास होतो – माजी जिप अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन

किष्टापूर (वेल) येथे टेनिस क्रिकेट बॉल सामन्यांचे उदघाटन

 

अहेरी/गडचिरोली, सुखसागर झाडे

अहेरी : क्रीडाक्षेत्र व खेळातून जिद्द, चिकाटी येते आणि व्यक्तिमत्व विकास होतो असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले. त्या 21 नोव्हेंबर रोजी अहेरी तालुक्यातील वेलगुर नजीकच्या किष्टापूर (वेल) येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे उदघाटना प्रसंगी उदघाटनीय स्थानावरून बोलत होते.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी किष्टापूर ग्रा.पंचायतीचे सरपंच नंदु तेलामी तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच पवन आत्राम, वेलगुर ग्राम पंचायतीचे माजी सरपंच कुसुम दुद्दीवार, सुरेखा सडमेक, आदिल पठाण, लक्ष्मण येरावार, तोटावार, श्रीनिवास विरगोनवार, विशेष भटपल्लीवार, संतोष तोरे, वामन मडावी, आदी मान्यवर उपस्थित होते.

उदघाटनीय स्थानावरून पुढे बोलतांना माजी जि. प.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम म्हणाले की, शिक्षण, क्रीडा व कला क्षेत्रातून व्यक्तिमत्व विकास होतो व खास करून क्रीडामुळे युवकांमध्ये खिलाडीवृत्ती येते त्यामुळे युवकांनी शिक्षणासोबतच खेळात अधिक आवड आणि रुची दाखवून आपली चमकदारी दाखवावी असे म्हणत भाग्यश्रीताई आत्राम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी फित कापून व फलंदाजीत फटका मारून (ट्रायल) क्रिकेट सामन्यांचे शानदार उदघाटन माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.  प्रास्ताविक व संचालन संजय गुरूनूले यांनी केले.

यावेळी जय सेवा युवा क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अजित आत्राम, उपाध्यक्ष प्रशांत सडमेक, सचिव मनीष मडावी, सहसचिव हरीश नैताम, विजय आत्राम, मोहन आत्राम, कैलास, प्रशांत सडमेक, सुनील सडमेक, नितेश कुमरे आदी आणि खेळाडू, प्रेक्षक व असंख्य युवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here