भारतीय संविधान दिनानिमित्त “देशाची शान-भारतीय संविधान” विषयावर आंतरमहाविद्यालयीन काव्यस्पर्धा

0
805

भारतीय संविधान दिनानिमित्त “देशाची शान-भारतीय संविधान” विषयावर आंतरमहाविद्यालयीन काव्यस्पर्धा

पुरोगामी साहित्य संसद व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संयुक्त आयोजन

 

चंद्रपूर : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून पुरोगामी साहित्य संसद व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “देशाची शान-भारतीय संविधान” या विषयावर आंतरमहाविद्यालयीन काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा येत्या २४ नोव्हेंम्बर ला सकाळी ११ वाजता श्रमिक पत्रकार भवन सभागृह वरोरा नाका चौक चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

या काव्यस्पर्धेच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी तथा समाज समता संघाचे केंद्रीय अध्यक्ष किशोर गजभिये राहतील. तर पुरोगामी साहित्य संसद महाराष्ट्र अध्यक्ष तथा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर, पुरोगामी साहित्य संसद चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षा ऍड. योगिता रायपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ संघटक निलेश ठाकरे, चंद्रपूर शहर अध्यक्ष मुन्ना तावाडे, भद्रावती कार्याध्यक्ष मनोज मोडक असतील.

सदर काव्यस्पर्धेचे सूत्रसंचालन पुरोगामी साहित्य संसदेच्या चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख कवयित्री सीमा भसारकर तर आभार जिल्हा संघटिका मृणाल कांबळे मानतील. काव्य स्पर्धेच्या परीक्षक स्थानी कवी नरेश बोरीकर, प्रदीप देशमुख, विजय वाटेकर व मधुकर दुफारे राहतील.

आयोजित आंतरमहाविद्यालयीन “देशाची शान-भारतीय संविधान” या विषयावरील काव्य स्पर्धेचा निकाल दुपारी १:३० वाजता घोषित केला जाणार असून या स्पर्धेचा निकाल, पुरस्कार वितरण व समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यस्थानी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ सल्लागार ऍड. राजेश सिंग राहतील. सदर होऊ घातलेल्या काव्य स्पर्धेत जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पुरोगामी साहित्य संसद व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here